एक्स्प्लोर

ताई लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत; आयसोलेट झालेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचा फोन

पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. "ताई लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यासोबत आहे," अशा शब्दात त्यांनी दिलासा दिला.

मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आजारी असल्याचं समजल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरुन त्यांची विचारपूस केली. "ताई तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे," अशा शब्दात त्यांनी पंकजा यांना दिलासा दिला. सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे पंकजा मुंडे आयसोलेट झाल्या आहेत.

धनंजय मुंडे म्हणाले की, "पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे. तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करुन घे. स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. खबरदारी म्हणून त्यांनी होम आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला.

पंकजा मुंडे या आजारी असल्याचे समजल्यानंतर धनंजय मुडे यांनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करुन घ्याव्यात, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी आणि लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरुन दिला आहे. तसंच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

दरम्यान धनंजय मुंडे यांनाही जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. यशस्वीरित्या कोरोनावर मात करुन ते घरी परतले. त्यामुळे कोविड-19 या आजारात होणाऱ्या त्रासाचा अनुभन असल्याने त्यादृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांना दिल्याचं समजतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Embed widget