Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींचे मानसपुत्र : मंत्री मंगलप्रभात लोढा
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसपुत्र आहेत, असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसपुत्र आहेत, असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य मिळाले. ते आज सर्वांना नोकरी देत आहोत. मी पण 27 वर्षे अर्ज करत राहिलो पण यंदा मंत्री पदाची नोकरी मिळाली. त्याआधी तीन वर्षे इंटर्नशिपवर होतो, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले. मुंबई अध्यक्ष असतो तर अजूनही मंत्री झालो नसतो. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली, असेही लोढा म्हणाले. हजारो नोकऱ्या गेल्या म्हणून ओरडून सांगितले जाते पण आम्ही याहॉलमध्ये एक लाख नोकऱ्या दिल्यात, असे म्हणत मंगल प्रभात लोढा यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवानातील दरबार हॉलमध्ये नामांकित उद्योग समूह, कौशल्य क्षेत्रिय परिषद आणि रोजगार प्रदाते यांच्यासमवेत परिसंवाद तसेच 1.11 लाख रोजगारासाठी सामंजस्य करार झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक रोजगारासाठी सामंजस्य करार झाले. या सामंजस्य करारात 44 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीचा समावेश आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार होतील.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सर्वाधिक भर हा रोजगारावर असेल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही राज्यात नवीन सरकार आल्यानंतर निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींनी 10 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय केला. आता आम्ही देखील 75 हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या जवळ चागली माणसे मिळत नाहीत असे सांगितले जातं तर तरुणाईला विचारले तर ते म्हणतात हाताला काम नाही. जे लोक सेवा पुरवठादार म्हणून काम करतात अशा लोकांना आम्ही बोलावलं आहे. एक लाखांपेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळणार आहे. आम्ही सामंजस्य करार करून विसरणारे लोक नाहीत. जोवर आकडा पार होत नाही तोवर आमचा संपर्क तुमच्याशी राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून कौशल्य विभागाचे अधिकारी काम करत आहेत. रोजगार हा विषय संवेदनशील असा आहे. हाताला काम देणारे हात देखील निर्माण व्हावेत. 1 लाख 21 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही हे करार करत आहोत. गेल्या दोन तीन महिन्यात म्हणत आहेत की उद्योग गेले, पण कुठलाही उद्योग एक दोन महिन्यात जात नाही. नजीकच्या काळात अनेक मोठे उद्योग राज्यात येतील. गेल्या अडीच तीन महिन्यात मोठे उद्योजक राज्यात आले आहेत. अनेक धाडसी निर्णय आपलं सरकार घेत आहे. विकास करणारे सरकार आहे, आम्ही 72 मोठे निर्णय घेतले. अगोदर फक्त घोषणा व्हायच्या पण आता आम्ही हाताला काम देत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंग कोशयारी काय म्हणाले?
मंगलप्रभात लोढा अधिक स्किलफुल आहेत, ते कोणताच कार्यक्रम सोडत नाहीत आणि जनताही त्यांना सोडत नाही. जनतेलाही लोढांना आणि सरकारला सोडायचे नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
इतक्या शॉर्ट नोटीसवर आपण आलात यातच अर्धे यश सामावले आहे. देशात नवी राजकीय क्रांती आणण्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्व गाजवलं. नद्या समुद्राला मिळतात तसेच विविध प्रांतातील लोकांनी महाराष्ट्रात मिसळून राज्याच्या क्रांतीत सहभाग घेतला आणि ते महाराष्ट्रात मिसळून गेले. देशाला असा प्रधानमंत्री मिळाला आहे ज्याला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, अयोध्या विषय, जगाला औद्योगिक पातळीवर भक्कम करणे आणि सर्वच बाबींमध्ये सातत्याने प्रयत्न केले. शिंदे फडणवीस आल्यापासून कामांना गती मिळाली. आधी केवळ सामंजस्य करार व्हायचे, प्रत्यक्षात काही होत नव्हतं आता तसे होणार नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.