एक्स्प्लोर

Mumbai Dabbawala home: मोठी बातमी: मुंबईचे डबेवाले आणि चर्मकारांना सरकारचं मोठ्ठं गिफ्ट, 25 लाखात 500 चौरस फुटांचं घर मिळणार

Mumbai home: मुंबईत डबेवाल्यांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये डबेवाल्यांना 500 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे.  यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची भर पडली. त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी (Mumbai Dabbawala) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत म्हाडाकडून (Mhada house) मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतंर्गत मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला मुंबईत 500 चौरस फुटांचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात याबाबतची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या संघटनेने शुक्रवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. सह्याद्री अतिथीगृहावरील आजच्या बैठकीला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आ. श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते.

डबेवाल्यांच्या घरांसाठीचा प्रकल्प कसा असणार?

मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण 12 हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रिॲलिटीकडून 30 एकर जागा देण्यात आली आहे. नमन बिल्डर्सकडून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम केले जाणार आहे. नमन बिल्डर्सकडून 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. त्यामुळे डबेवाल्यांना 500 चौरस फुट क्षेत्रफळाचे घर अवघ्या 25 लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

आणखी वाचा

39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर, 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त

मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?

मुंबईतील 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त केली, आता म्हाडा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget