एक्स्प्लोर
संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये तर महाराष्ट्राची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस
राज्यात राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या 12 जागा रिक्त झाल्यानंतर यासाठी राजकारण कमालीचे पेटले आहे. राज्यपाल या नियुक्तिंसाठी अधिकच वेळ घेत असल्याचा आरोप सामनाच्या रोखठोक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.
कल्याण : संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये, त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी, असा टोला विधान सेभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यापेक्षा त्यांनी कोविड पेशंटला उपचार मिळत नाहीत, त्यांचे काय होणार? यासंबंधी प्रश्न विचारला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं, हा विषय डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. देवेंद्र फडणवीस हे आज कल्याण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांना लक्ष्य केलं.
संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. याला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये, त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी, यापेक्षा त्यांनी कोविड पेशंटला उपचार मिळत नाहीत, त्यांचे काय होणार, संबंधी प्रश्न विचारला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं. हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला. कल्याण येथील होली क्रॉस हॉस्पिटलला भेट देत कोविड उपचारासंबंधी माहिती घेतली. यावेळी बैठकीला महापालिका आयुक्त, अधिकारी, भाजपचे आमदार तसेच प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.
पंतप्रधानांकडून 'बिहार रेजिमेंट'चेच कौतुक, सामनातून मोदींवर टीकास्त्र
ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा पैजा : संजय राऊत
ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा पैजा लागल्या असल्याचा रोखठोकमधून संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विधान परिषदेवर राज्यपालांच्या सहीने 12 जणांची नेमणूक होईल, पण सध्याचे राज्यपाल या नेमणुका करण्यास अनुकूल नाहीत असे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाले. ते चिंताजनक आहे. सरकारने 12 सदस्यांच्या शिफारसी केल्या तरी राज्यपाल या शिफारसींवर तत्काळ सही करणार नाहीत. पुढील दोन महिने म्हणजे सप्टेंबरपर्यंत सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपाल मान्य करणार नाहीत. 15 जूनला सर्व 12 सदस्यांची मुदत संपली व या जागा रिक्त झाल्या. त्या तत्काळ भरल्या तर नवे सदस्य कामाला लागतील. आमदार म्हणून ते महाराष्ट्राची सेवा करतील, पण सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर 12 सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी ? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त 12 जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे!
Politics | ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचा पैजा लागल्या; रोखठोकमधून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement