एक्स्प्लोर
Advertisement
टॅम्पिंग मशिन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पालघर आणि केळवा रोड स्टेशन दरम्यानच्या अप मार्गावर ट्रॅक दुरुस्त करणारं टॅम्पिंग मशिन रात्री घसरलं.
पालघर : पालघर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पालघर आणि केळवा रोड स्टेशनदरम्यान टॅम्पिंग मशिन रुळावर घसरल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. टॅम्पिंग मशिन रुळावरुन हटवलं असलं तरी, लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास आणि लोकल गाड्याही 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत.
पालघर आणि केळवा रोड स्टेशन दरम्यानच्या अप मार्गावर ट्रॅक दुरुस्त करणारं टॅम्पिंग मशिन रात्री घसरलं. यामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक मध्यरात्रीनंतर सुमारे तीन-चार तास ठप्प झाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या किमान दीड-दोन तास विलंबाने धावत होत्या. परिणामी विरार-डहाणू रोड दरम्यान उपनगरीय सेवाही विस्कळीत झाली आहे.
आज पहाटे सहाच्या सुमारास हे मशिन रुळावरुन दूर करण्यात आलं. परंतु वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवर त्याचा परिणाम दिसत आहे. बॅकलॉग भरुन काढण्यासाठी अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.
1. 12902 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल गुजरात मेल दादरपर्यंतच चालवली जाणार आहे
2. 12928 वडोदरा-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसही दादरपर्यंत चालवली जाईल.
3. 59442 मुंबई सेंट्रल अहमदाबाद पॅसेंजरता शेवटचा थांबा दादर असेल.
4. 59024 मुंबई सेंट्रल वल्साड फास्ट पॅसेंजर बोरीवली स्टेशनपर्यंत चालवली जाईल
5. 19218 वांद्रे टर्मिनस सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसही बोरीवलीपर्यंतच चालवली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement