एक्स्प्लोर
Advertisement
टोल नाक्यावर कार्ड स्वाईप केलं, 4 मिनिटात 87 हजार रुपये गेले!
टोल नाक्यावर डेबिट कार्ड स्वाईप करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. खालापूर टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल डेबिट कार्डद्वारे भरल्यानंतर, काही तासातच त्याच्या अकाऊंटमधून तब्बल 87 हजार रुपये गायब झाले.
मुंबई: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्याचं आवाहन करत आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे सायबर चोरट्यांचं प्रमाणही वाढत चालल्याचं दिसून येतं आहे.
टोल नाक्यावर डेबिट कार्ड स्वाईप करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. खालापूर टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल डेबिट कार्डद्वारे भरल्यानंतर, काही तासातच त्याच्या अकाऊंटमधून तब्बल 87 हजार रुपये गायब झाले. दर्शन पाटील या 36 वर्षीय तरुणाला हा फटका बसला. ‘मिड डे’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
दर्शन पाटील हे शनिवारी 9 सप्टेंबरला मुंबईहून पुण्याकडे जात होते. त्यावेळी त्यांनी खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केलं. कार्डद्वारे त्यांनी संध्याकाळी 6.27 वाजता 230 रुपयांचा टोल भरला. पण त्यांनंतर 8.31 वा त्यांना अकाऊंटमधून 20 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर काही क्षणातच 6 मेसेज आले. अशाप्रकारे त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल 87 हजार रुपये गेले होते.
हडपसर पोलिसात तक्रार
या प्रकारानंतर दर्शन पाटील यांनी पुण्यातील हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.
4 मिनिटांत 87 हजार गायब
दर्शन पाटील यांना 4 मिनिटांत पैसे कट झाल्याचे धडाधड मेसेज आले. चोरट्यांनी मोठी ट्रान्झॅक्शन केलीच, पण 100 आणि दहा रुपयांचेही व्यवहार दर्शन यांच्या डेबिट कार्डवरुन केले. केवळ 4 मिनिटांत तब्बल 87 हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमधून गायब झाले.
पिन आणि प्रायव्हसी
“मी माझा पिन नंबर कोणालाही दिला नव्हता. टोलनाक्यावरही मी स्वत:च पिन एण्टर केला होता. पण टोलनाक्यावरची खिडकी ही थोडी उंचीवर होती, शिवाय तिथे सीसीटीव्ही कॅमेराही आहे. त्यामुळे माझा पिन नंबर टोल कर्मचाऱ्यांनी पाहिला असल्याची शक्यता नाकारता येत नाही”, असं दर्शन पाटील यांनी म्हटलं.
महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी जे ट्रान्झॅक्शन केले, त्यावेळी दर्शन पाटील यांना कोणताही ओटीपी (OTP) आला नाही. त्यामुळे दर्शन पाटील मोठ्या संभ्रमात आहेत.
दर्शन यांनी बँक आणि पोलिसांत याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस चोरट्यांचा शोध कधी घेणार आणि अकाऊंटमधून गेलेले पैसे मिळणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement