एक्स्प्लोर
दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : दाऊद कॉलिंग प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसें यांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन, मनीष भंगाळे आणि जयेश दवे यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
“साईट हॅक करणं किंवा एखाद्याबाबत माहिती घेणं हा गुन्हा आहे. पाकिस्तानची साईट हॅक करुन काढलेली माहिती सर्वप्रथम पोलिसांना देणं गरजेचं होतं. मात्र, मनीष भंगाळेंनी ही माहिती स्वत:कडे ठेवली. त्यामुळे क्राईम ब्रँचने त्यांची चौकशी करुन या तिघांवरही गुन्हे दाखल करावे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत.”, अशी मागणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि एकनाथ खडसेंचा राजीनामा घेऊन दाऊद कॉलिंग प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, मुंबई पोलिसांनी एकनाथ खडसेंना या प्रकरणात क्लीन चिट दिली. त्यामुळे आता एकनाथ खडसेंनी प्रीती मेनन, मनीष भंगाळे आणि जयेश दवे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















