एक्स्प्लोर
Advertisement
डिझेल दरवाढीचा फटका, मुंबईत जीवनावश्यक वस्तू महागणार!
डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे आता आपल्याला भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे.
नवी मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.
डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे आता आपल्याला भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे. येत्या शुक्रवारी ही भाडेवाढ होणार असल्याने याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होणार आहे.
भाडेवाढ अटळ?
भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा, अन्नधान्य यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. याचा परिणाम म्हणजे महागाई गगनाला भिडणार आहे. दुसरीकडे वाढलेले भाडे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
येत्या शुक्रवारी मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघाची बैठक होणार आहे. यात 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. पेट्रोलजन्य पदार्थांबरोबर इन्शुरन्स, टायर किंमती वाढल्या असून चालकांचे पगारही वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं वाहनधारकांचं म्हणणं आहे.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधून मुंबईच्या विविध भागात पिकप व्हॅन आणि टेम्पोने भाजीपाला, फळे आणि कांदा, बटाटा नेण्यात येतो. या सर्व मार्गांच्या सध्या असलेल्या भाड्यात 20 ते 30 टक्के वाढ होणार आहे.
मार्ग सध्याचे भाडे वाढणारे भाडे
एपीएमसी मार्केट ते दादर - 1200 ते 1500 1500 ते 2000
एपीएमसी मार्केट ते अंधेरी - 1500 ते 2100 2000 ते 2500
एपीएमसी मार्केट ते बोरीवली - 2000 ते 2500 2600 ते 3200
एपीएमसी मार्केट ते कुलाबा - 2000 ते 2500 2600 ते 3200
एपीएमसी मार्केट ते वसई-विरार – 3000 ते 3500 3700 ते 4300
शेतकऱ्यांनाही फटका
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये बाहेरुन येणाऱ्या शेतीमाल वाहतुकीचंही भाडं वाढणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातून वाशी एमपीएमसीत येणाऱ्या भाजीपाला, कांदा बटाटा, फळ आणि अन्यधान्य यांच्या गाड्यांचेही भाडे वाढणार असल्याने याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
एपीएमसीमध्ये माल पोहोचवण्याचं भाडं शेतकरी देत असल्याने भाडे वाढल्यास शेतकऱ्यांच्या खिशातील पैसे जाणार आहेत. मालाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. शेतकरी एकीकडे अगोदरच झळ सोसत असताना जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरी ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे.
संबंधित बातम्या :
... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल
पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?
पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement