Dahihandi 2024: ठाणे, मुंबईत गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार; जय जवान यंदा विश्वविक्रम रचणार?
Dahihandi LIVE: गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत.
LIVE
Background
Dahihandi LIVE मुंबई: दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज झाली आहेत.
दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात तरुण सकाळी घराबाहेर पडतात. मात्र हा उत्साह शिगेला पोहचण्याबरोबरच गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. मागील काही वर्षांमध्ये दहीहंडी फोडण्यामध्ये गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे. दरवर्षी तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. अत्यावश्यक शल्यचिकित्सा विभाग व अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागातील डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आले असून, जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.