एक्स्प्लोर

Dadar Kabutar Khana: दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला जाळ्या का लावल्या? अखेर कारण आलं समोर...

Dadar Kabutar Khana: आज दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला जाळ्या का लावल्या आहेत याचं कारण अखेर सांगण्यात आलं आहे.

दादर: मुंबईतील कबुतरखान्यावरुन (Kabutar Khana) दोन दिवसांपूर्वी जैन समाज आक्रमक झाला होता. जैन समाजाने बुधवारी 6 ऑगस्ट दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) परिसरात मोठं आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकली. यावेळी जैन आंदोलकांनी ताडपत्री, बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या. ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबुतरखाना पुन्हा सुरू केला. लगेच धान्य टाकून कबुतरांना आंदोलकांनी खाद्य दिलं. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान याच विषयावर बोट ठेवत चित्रा वाघ यांनी ज्या मंदीरासमोर आंदोलन झाले तिथेही जाळ्या लावल्या आहेत. या कबूतरांच्या विष्ठेचा त्रास जात-धर्म बघून होतं नाही. जैन मंदीराने जाळ्या काढाव्यात, कबुतरांना आत घ्या, येऊदेत मंदीरात, असं म्हटलं होतं, त्यानंतर आज दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला जाळ्या का लावल्या आहेत याचं कारण अखेर सांगण्यात आलं आहे.

 म्हणून जैन मंदिरात जाळी लावली...

एबीपी माझाशी बोलताना जैन व्यक्तीने सांगितले की, कबुतरे आत मंदिरात येतात म्हणून या जाळ्या लावलेल्या नाहीत, तर मंदिरामध्ये पंखे आहेत, पंखे सुरू असतात, त्या पंख्यांमध्ये अडकून एखाद्याचा पक्षाचा जीव जाऊ नये, म्हणून जाळ्या लावलेल्या आहेत, त्या जाळ्या उलट पक्षांचा जीव वाचवण्यासाठी लावलेल्या आहेत. याच दुसरं कोणतंही कारण नाही, मानवी आरोग्य चांगलं राहावं हे मान्य आहे, मात्र त्यांना उपाशी मारावं हे चुकीचं आहे, असं एका जैन बांधवाने सांगितलं.

 तर दादरमध्ये असलेल्या कबुतरखान्याच्या आसपास राहणाऱ्या काही महिलांनी सांगितलं की, तो जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे,  कबुतरखाने असावेत पणते शहरांच्या मध्यवर्ती भागामध्ये नसावेत, ते ज्या ठिकाणी कमी लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी ते असावेत, कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे, आम्हाला तो मान्य देखील आहे, कबुतरांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. ते घराच्या खिडक्यांवरती आणि एसीच्या पंख्यावरती घाण करतात, त्यांच्यामुळे आरोग्याला देखील धोका पोहोचतो, त्यामुळे हे कबुतरखाने या ठिकाणाहून हलवावेत असं आम्हाला वाटतं असं दादरच्या कबुतरखाना परिसरातील महिलांनी म्हटलं आहे.

दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला कबुतरांमुळे त्रास होऊ नये, ते मंदिरात येऊन घाण करू नयेत म्हणून जाळ्या लावण्यात आल्या आहेत, असं काहींनी म्हटलं होतं. कबुतरांमुळे मंदिराच्या स्वच्छतेला बाधा येत होती, त्यामुळे ही जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला, यावर बोलताना एका जैन बांधवाने म्हटलं की, मंदिराच्या आतमध्ये असलेल्या पंख्यामुळे त्यांचा जीव जाऊ नये म्हणून तिथे जाळ्या लावलेल्या आहेत. इतर कोणत्या ठिकाणी किंवा आमच्या दुकानामध्ये पंखा नसल्यामुळे जाळी लावलेली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
Virar Crime News: पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Devendra Fadnavis : जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी, पार्थ पवारांची भेट ते मनोज जरांगेंचं आंदोलन, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
Embed widget