एक्स्प्लोर

Dadar Kabutar khana: दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाज प्रचंड आक्रमक, मनसेची पहिली प्रतिक्रिया

Dadar Kabutar khana: देवेंद्र फडणवीसांनी शब्द देऊनही जैन समाज आक्रमक का झाला, हे कायद्यात बसतं का? मनसेचा सवाल. मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता.

Dadar Kabutar khana: मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखान्याबाहेर बुधवारी सकाळी जैन समाज प्रचंड आक्रमक होताना दिसला. मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताडपत्री टाकून हा कबुतरखाना (Kabutar khana) बंद केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत कबुतरखाने बंद न करता त्याठिकाणी पक्ष्यांना नियंत्रित स्वरुपात खाणे देण्यात यावे, असे निर्देश महापालिकेला दिले होते. तसेच दादर कबुरतखान्यावरील ताडपत्री काढण्याचे आदेशही दिले होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून ही ताडपत्री हटवण्यास उशीर झाल्याने बुधवारी जैन समाज प्रचंड आक्रमक झाला. जैन समाजाच्या आंदोलकांनी बुधवारी कबुतरखान्यावर चढून बांबू तोडून टाकले. जैन समाजाच्या काही महिलांनी सोबत आणलेल्या चाकू आणि सुऱ्यांनी ताडपत्री बांधण्यासाठी आणलेल्या सुतळी कापून काढल्या आणि ताडपत्री खेचून काढली. यावेळी कबुतरखान्याच्या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. जैन आंदोलकांनी येथील वाहतूक रोखून धरली होती. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया करताना या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

मंगलप्रभात लोढा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल यासंदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कबुतरखान्यासंदर्भात निर्देश दिले होते. उद्या याप्रकरणाची हायकोर्टात सुनावणी आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता जैन समाजाकडून जे सुरु आहे, ते नियमाला धरुन आहे का, हे नियमबाह्य आहे. आता मंगलप्रभात लोढा या सगळ्यावर बोलत का नाहीत? लोढा यांनी यावर खुलासा करावा. प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी, असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले. धर्माच्या गोष्टी एका बाजूला, एका बाजूला विज्ञान आहे. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तातडीने हस्तक्षेप केला होता. मग गृहमंत्र्यांनी आश्वासन देऊनही जैन समाज इतका आक्रमक का झाला? त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वास नाही का, असा सवाल अभ्यंकर यांनी उपस्थित केला. या सगळ्या प्रकारानंतर आता मनसे आक्रमक होणार का, हे बघावे लागेल. मनसेने कबुतरखान्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे गंभीर रोग होतात. त्यामुळे कबुतरखाने हटवण्यात यावेत, या मागणीसाठी मनसे आग्रही होती.

आणखी वाचा

दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली, बांबू तोडले; जैन समाज आक्रमक, नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही'; कबुतरांना खाणं देण्याची जबाबदारीही बीएमसीलाच दिली

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget