एक्स्प्लोर

Kabutar Khana Dadar: दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली, बांबू तोडले; जैन समाज आक्रमक, नेमकं काय घडलं?

Kabutar Khana Dadar: दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.

Kabutar Khana Dadar मुंबई: दादरच्या कबुतरखान्यावरील (Dadar Kabutar Khana) ताडपत्री हटवण्यासाठी आज (6 ऑगस्ट) जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले. दरम्यान, कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली होती. 

मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर कारवाई करण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर खाणे मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला काही लोकांकडून विरोध केला जातोय. मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत, यासाठी जैन समाज चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह जैन समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. यानंतर दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं.

कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक-

आज दादर कबुतरखान्याच्या परिसरात जैन समाजाकडून प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज सकाळीच काही जैन बांधवांनी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु, आम्ही कुठलीही जोरजबरदस्ती करुन ताडपत्री हटवणार नाही, असे म्हटले होते. मात्र, पालिकेने कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यापूर्वीच जैन समुदायाचा जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढून टाकली. 

कबुतरखाना का बंद केला?, कारणे काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. हा कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे. हा कबुतरखाना दादरची ओळख बनला होता. मात्र, याठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचे समोर आले होते. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या. याशिवाय, हा कबुतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा कबुतरखाना हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.

कबुतरखान्यावरुन उच्च न्यायालयाने काय म्हटलं?

कबुतरांच्या थव्याला खायला घालणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देशही न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले. शहरातील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांचे जमाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आणि कठोर उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देशही न्यायालयाने बीएमसीला दिले.

कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज-

मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कबुतरखाने बंद करु नयेत, असे आदेश महापालिकेला दिले होते.

दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस

दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फिडिंग करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद केले. परंतु त्यावरून गुजराती जैन समूदाय मात्र आक्रमक झाल्याचं दिसून आला. 

कबुतरांमुळे मानवांमध्ये धोकादायक होतात आजार-

कबुतर मानवांमध्ये काही विशिष्ट आजार पसरवू शकतात, जे त्यांच्या विष्ठेद्वारे (बीट), पिसे, शरीरातून बाहेर पडणाऱ्या धुळीच्या कणांद्वारे किंवा परजीवींद्वारे पसरतात. त्यांना झुनोटिक आजार म्हणतात, म्हणजेच प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारे आजार. यामध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाज्मोसिस सायटाकोसिस किंवा पोपट ताप, साल्मोनेलोसिस, एव्हीयन माइट इन्फेस्टेशन आणि टॉक्सोप्लाज्मोसिस सारखे आजार समाविष्ट आहेत.

दादरच्या कबुतरखान्याजवळ नेमकं काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Mumbai Kabutar khana: मनसेच्या मागणीला मोठं यश, BMC दादरमधील कबुतरखाना हटविण्याच्या तयारीत, वरळी किंवा प्रभादेवीत स्थलांतर?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 
Maharashtra Live Blog Updates: 20026 ची NEET परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावा लागणार 

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Embed widget