एक्स्प्लोर
मुंबई पोलिसांनी गँगस्टर डी. के. रावच्या मुसक्या आवळल्या!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता डी. के. रावच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव याला अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. राववर अटकेची कारवाई केली.
अँटॉप हिलच्या एसआरए कन्सल्टंटला धमकावून 50 लाखांची मागणी डी. के. रावने केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता डी. के. रावच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
डी. के. रावचा अधिकाधिक कालावधी तुरुंगातच गेला असून, 2016 साली तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.
डी. के. रावचं मूळ नाव रवी मल्लेश वोरा आहे. काही वर्षांपूर्वी इन्स्पेक्टर मदुला लाड यांच्यासोबतच्या चकमकीत डी. के. राव जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या खिशात बँकेचं बनावट आयकार्ड मिळालं होतं. त्यावरील नाव डी. के. राव असे होते. तेव्हापासून तो डी. के. राव या नावानेच अंडरवर्ल्डमध्ये ओळखला जातो.
काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली आणि आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. रावला अटक केली आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डचा खात्मा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येते आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























