एक्स्प्लोर
सायबर सिटी असलेल्या शहरात सायबर गुन्ह्यांत तिपटीने वाढ
नवी मुंबई पोलिसांची वार्षिक पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आयुक्तांनी माहिती दिली. 2019 च्या तुलनेत 2020 ला गुन्ह्यांमध्ये घट झाली असून 2020 ला 4331 गुन्हे दाखल झाले आहेत.

नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात सायबर गुन्ह्यात तिपटीने वाढ झाली आहे. कोरोना काळात हे गुन्हे वाढले असून, 232 सायबर गुन्हे दाखल आहेत, यातील फक्त 21 गुन्हे उघडकीस आले आहे ,211 गुन्हे अजून प्रलंबीत असल्याची माहीती पोलीस आयुक्त बीपीनकुमार सींह यांनी दिली. नवी मुंबई पोलिसांची वार्षिक पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आयुक्तांनी माहिती दिली. 2019 च्या तुलनेत 2020 ला गुन्ह्यांमध्ये घट झाली असून 2020 ला 4331 गुन्हे दाखल झाले आहेत. 2019 पेक्षा 1256 ने कमी आहेत.लॉक डाऊनमुळे इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी सायबर क्राईम मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये फेसबुक मैत्रीचे -4 गुन्हे , ऑनलाईन फसवणूक- 109 गुन्हे ,कार्ड क्लोनिग -15 गुन्हे , ऑनलाईन नोकरीचे आमिष - 9 गुन्हे , ओटीपी कोड -55 गुन्हे , ओ ऐल एक्स वर - 32 गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचे प्रकार 2019 2020 सायबर गुन्हे 74 232 खून 53 41 दरोडा 6 5 चोरी 548 356 बलात्कार 169 125 मोटार अपघात गुन्हे 501 330
आणखी वाचा























