एक्स्प्लोर

होळीकरीता झाडे तोडल्यास धुलिवंदन तुरुंगात साजरे करावे लागणार!

होळीकरीता झाडे तोडल्यासर धुलिवंदन तुरुंगात साजरे करावे लागणार आहे, कारण तसे आदेश मुंबई पोलीसांनी जारी केले आहेत. सोबतच सार्वजनिक ठिकाणी गुलाल, फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्या फेकल्यासही कारवाई होणार आहे.

मुंबई : होळीकरीता झाडे तोडल्यास धुलिवंदन तुरुंगात साजरे करावे लागणार आहे. कारण मुंबई पोलिसांनी तसे आदेश जारी केलेत. यामुळे मुंबईकरांनो झाडे तोडून पर्यावरणारचे नुकसान करू नका, अन्यथा तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल. तर, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उडवण्यास, फुगे आणि प्लास्टिकच्या पिशव्या मारण्यावर देखील सक्त मनाई करण्यात आली आहे. आज होळी असल्याने अनेक ठिकाणी होळी करण्याकरीता झाडे तोडली जातात. त्यामुळे आधीच झाडे कमी असलेल्या मुंबईत वृक्षतोड होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत आधीच झाडे कमी, त्यात अनेक प्रकल्पानिमित्त हजारो झाडे तोडण्यात येत आहेत. शिवाय होळीकरिता मुंबईत ठिकठिकाणी झाडे तोडून होलिकादेवी म्हणून तोडलेल्या झाडांची पुजा केली जाते आणि तीच झाडे जाळली जातात. मात्र, यंदा होळिला झाडे तोडल्यास धुलिवंदन जेलमध्ये साजरे करावे लागू शकते. कारण झाडे तोडून होळी साजरी केल्यास पर्यावरण कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते. प्रसंगी पोलिस तुम्हाला अटकही करू शकतात. Coronavirus | कोरोनापासून दूर राहण्यासाठी सचिनचा 20 सेकंदाचा व्हिडीओ पाहा एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर गुलाल उधळल्यास, फुगे मारल्यास किंवा पाण्याने भरलेल्या पिशव्या मारल्यासही कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. होळी आणि धुलिवंदना निमित्त मुंबईभर 40 हजारपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून महिलांची छेडछाड रोखण्याकरता साध्या वेशातील विशेष महिला छेडछाड पथक देखील मुंबईत पुढील दोन दिवस गस्त घालणारेत. Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवरील रिट्रीट सोहळा रद्द, आयफा सोहळाही पुढे ढकलला पोलीसांची होळीसाठी विशेष तयारी
  • कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त, विभागीय पोलिस अधिकारी व अंमलदार, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी. एस., असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय
  • मुंबईतील महत्वाची ठिकाणे, चौपाट्या, धार्मिक स्थळे, राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल्स, आणि गर्दीची ठिकाणे येथे सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्हीद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. तर, तळीरामांना पकडण्यासाठी मुंबई वाहतुक विभागातर्फे सुमारे 1450 पेक्षा जास्त पोलिस ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहेत.
  • धुलिवंदन हे सण आनंदाचे रंग उधळारे सण आहेत. मात्र, कायदा मोडल्यास रंगाचा बेरंग होवू शकतो. शिवाय सध्या जगभरात चालू असलेल्या कोरोना या आजाराच्या अनुषंगाने नागरीकांनी स्वत:ची काळजी घेवुन उत्सव साजरा करावा, असं मुंबई पोलीसांतर्फे आवाहन करण्यात आलंय.
Corona Virus Holi Decoration | बीडीडी चाळीतला होलिकोत्सव, उभारली कोरोना वायरसची राक्षसरुपी प्रतिकृती

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
FDA Action On Mumbai Hotel: मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDA ची कारवाई, परवाना निलंबित; कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?
मुंबईतील आणखी 4 हॉटेलवर FDA ची कारवाई, परवाना निलंबित; कोणकोणत्या हॉटेल्सचा समावेश?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget