एक्स्प्लोर

काळा घोडा फेस्टिव्हल दरम्यान क्रॉस मैदानावर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

काळा घोडा फेस्टिव्हल दरम्यान खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावण्यास किंवा विक्रीला हायकोर्टाने मनाई कायम ठेवली आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईची ओळख आणि तरूणाईचं आकर्षण असलेला 'काळा घोडा फेस्टिवल'साठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यास तसेच तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठीही क्रॉस मैदानाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मात्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानाचा वापर करण्याची परवानगी दिलेली आहे. यंदा एक फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर काळा घोडा महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षांपासून चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानावर घेतले जातात. मात्र, हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी यंदाही काळा घोडा महोत्सवाच्या आयोजकांनी न्यायालयाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून आणि जिल्ह्याधिकाऱ्यांनी १३ जानेवारीला यासंदर्भात दाखल केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची दखल घेत हायकोर्टानं हे आदेश दिले आहेत. विदर्भातील मामा-भाचे यात्रा; नववर्षाच्या पहिल्या दिवशी घनदाट जंगलात भरतो उत्सव तसेच इथं होणारे मनोरंजनात्मक आणि सामाजिक कार्यक्रम हे सर्व सामान्यांसाठीही खुले ठेवण्यात यावेत, त्यासाठी कोणतंही व्यावसायिक शुल्क आकारण्यात येऊ नये. या निर्देशांचंही पालन होईल अशी लेखी हमी आयोजकांना न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत हायकोर्टानं .यासंदर्भातील सुनावणी 11 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. काळा घोडा महोत्सव - काळा घोडा महोत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण असतं लोकनत्य आणि विविध शास्त्रीय नत्यकला. महोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारं प्रदर्शन. विविध प्रांतातील कपडे, दागिने, हातमागाच्या वस्तू यांनी हा परिसर फुलून जातो. काळा घोडाच्या निमित्ताने अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठी संधी असते. चित्रकला, फोटोग्राफी, कलात्मक वस्तू आपलं लक्ष वेधून घेतात. या कलाकृतींतून काही संदेशही देण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीनं हा कलेचा उत्सव पाहण्यासाठी मुंबईसह भारतातीलच नाही; तर जगभरातून रसिक येतात. पुढचा आठवडाभर कलेच्या उपासकांसह रसिकांसाठीही ही मोठी पर्वणी असणार आहे. Mann Deshi Mahotsav | रवींद्र नाट्य मंदिर परिसरात माणदेशी महोत्सवाचं आयोजन | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget