एक्स्प्लोर

पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोसळलेल्या पादचारी पुलाचं ऑडिट झालं नव्हतं, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, म्हणूनच याला रेल्वे जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नगरसेविका सानप यांनी केला आहे.

मुंबई : दोन-तीन वर्षांपूर्वीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोसळलेल्या पादचारी पुलाचं ऑडिट झालं नव्हतं, त्यामुळेच ही दुर्घटना घडली, म्हणूनच याला रेल्वे जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नगरसेविका सानप यांनी केला आहे. सानप म्हणाल्या, लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, हा पूल महापालिकेचा असल्याचे सांगत रेल्वेने हात झटकले आहेत. यावेळी भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत, लोकांच्या सुरक्षेचे काय ?, असा संतप्त सवाल आमदार वारिस पठाण यांनी विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक 34 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत 35 वर्षीय अपूर्वा प्रभू (35) , रंजना तांबे (40 ), जाहीद सिराज खान (32) यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे.  या घटनेतील मृतक महिला जीटी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे.

या पुलाचा जवळपास 60 टक्के स्लॅब रहदारीच्या रस्त्यावर कोसळल्याने एकच हाहाकार उडाला.

पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका पोहोचल्या असून पुलाच्या स्लॅबचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पुलाचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे

या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना हलवलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनास्थळी   सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे.  सीएसएमटी स्टेशनवर पुलाचा स्लॅब कोसळलेल्या घटनास्थळी पुढील काही वेळात पोहचेल अशी माहिती आहे.

टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आहे. या पुलाचा कामा रूग्णालयानजीकचा भाग कोसळला आहे. या पुलावर असलेला क्राँक्रिट स्लॅब पूर्णपणे पडलं असून आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे. सध्या घटनास्थळावरून गर्दी हटवणं हे सध्याचं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथील गर्दी कमी करण्याचे काम सुरू आहे. ही गर्दी CST स्थानकाकडे हलवण्यात येत आहे.

VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget