(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Update : गुरुवारी मुंबईत 827 नवे रुग्ण, 1366 जणांची कोरोनावर मात
Mumbai Corona Update : बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. बुधवारी मुंबईत 1,128 कोरोना रुग्ण आढळले होते. आज, गुरुवारी यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे.
Mumbai Corona Update : बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. बुधवारी मुंबईत 1,128 कोरोना रुग्ण आढळले होते. आज, गुरुवारी यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईत 827 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1366 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,22,292 इतकी झाली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 97 टक्केंवर पोहचला आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 7601 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 623 दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.11% टक्के इतका झालाय. मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झालाय.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 3, 2022
3rd February, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 827
Discharged Pts. (24 hrs) - 1366
Total Recovered Pts. - 10,22,292
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 7601
Doubling Rate -623 Days
Growth Rate (27Jan - 2Feb)- 0.11%#NaToCorona
सध्या मुंबईतील 3 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 827 रुग्णांपैकी 105 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 279 बेड्सपैकी केवळ 1 हजार 768 बेड वापरात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai : मुंबई विमानतळाची शान परतली, कोरोना काळानंतर 9 महिन्यांत 146 टक्के वाढीची नोंद
- Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha