Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी 536 नवे कोरोनाबाधित, तर 1 हजार 153 जण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांपासून कमी होणारी मुंबईतील रुग्णसंख्या आजही कमी झाली आहे. रविवारी मुंबईत 536 कोरोना रुग्ण आढळले होते.
Mumbai Corona Update : मुंबईत कमी होणारी रुग्णसंख्या आजही कायम राहिली आहे. रविवारी मुंबईमध्ये 236 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 536 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 153 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार 743 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 730 दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.10% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे तीन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईत केवळ एक इमारत सील करण्यात आली आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 536 रुग्णांपैकी 98 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 122 बेड्सपैकी केवळ 1 हजार 499 बेड वापरात आहेत.
राज्यातील रुग्णसंख्या 10 हजारांखाली
महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांची कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीदरम्यान 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा :
- Omicron Origin : खरंच उंदरातून माणसांमध्ये आला ओमायक्रॉन?, अभ्यासातील दावा
- कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार, जिल्हा शल्यचिकित्सकांचा इशारा
- Trending : मला कोरोना झालाय, रजा हवी, गंडवणाऱ्या महिलेला बॉसकडून मोठी शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha