Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, शनिवारी 201 रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांत वाढत असलेली मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत अनुक्रमे 202 आणि 201 रुग्णांची नोंद झाली आहे.
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांत वाढत असलेली मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत अनुक्रमे 202 आणि 201 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी मुंबईत 259 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे मागील तीन दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचकालावधीत 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2870 दिवसांवर आला आहे. मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता. त्यामुळे सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.
शनिवारी मुंबईतील 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1034207 इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका झाला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1632 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या 201 रुग्णांपैकी 26 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 315 बेड्सपैकी केवळ 882 बेड वापरात आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 19, 2022
19th February, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 201
Discharged Pts. (24 hrs) - 345
Total Recovered Pts. - 10,34,207
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 1632
Doubling Rate -2870 Days
Growth Rate (12Feb - 18Feb)- 0.02%#NaToCorona
राज्यातील कोरोना रुग्ण घटले, शनिवारी 1 हजार 635 नव्या रुग्णांची नोंद -
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 29 तासात 4 हजार 394 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 91 हजार 064 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 22 हजार 920 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1081 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 71 लाख 29 हजार 145 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.