कोरोना व्हायरस भिवंडीतील यंत्रमाग, वस्त्रोद्योग व्यवसायाच्या पथ्यावर; कापडाची मागणी वाढली
चीनमध्ये देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतसह जगातील इतर अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडांची निर्यात करणारे वस्त्रोद्योगांसह अन्य व्यवसाय ठप्प पडले आहेत. चीनहून येणार्या वस्तूही घेतल्या जात नाहीत.
भिवंडी : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो जणांनी याची लागण झाली आहे. तसेच भारतात देखील कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने देशात खळबळ माजली आहे. त्यामुळे सर्व देशांनी चीन मधून होणारे आयात-निर्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर बंद केले आहेत. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या अनेक वस्तूंची मागणी वाढली आहे.
देशातील सर्वात मोठा मॅंचेस्टर मानल्या जाणाऱ्या भिवंडी शहराची रात्रंदिवस सुरू असणारी धडधड ही नोटबंदी, जीएसटी तसेच वाढत्या वीज बिलामुळे जणू बंद झाली होती. त्यात चीनवरुन येणारा कपडा स्वस्त दरात असल्याने भारतातील कपड्यांच्या मागणीमध्ये घट झाली होती. त्याचा देखील फटका या यंत्रमाग आणि कापड व्यवसायिकांना बसला होता. त्यामुळे कापड व्यवसायिक पूर्णतः खचून गेल होते. एकट्या भिवंडी शहरात जवळपास 7 ते 8 लाख यंत्रमाग असून या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र सध्या दोन ते अडीच लाख यंत्रमाग उरले असून इतर यंत्रमागधारकांनी आपले कारखाने आणि यंत्रमाग 20 रुपये किलोप्रमाणे भंगाराच्या भावात विकून टाकला आहे. तर काहींनी हा व्यवसाय सोडून देण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत यंत्रमाग तसेच कापड उद्योगावर एवढी मोठी मंदी आजवर आली नव्हती.
मात्र, चीनमध्ये देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतसह जगातील इतर अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापडांची निर्यात करणारे वस्त्रोद्योगांसह अन्य व्यवसाय ठप्प पडले आहेत. चीनहून येणार्या वस्तूही घेतल्या जात नाहीत. भारतासह इतर देशांची निर्यातही बंद झाली आहे. चीनचा कापड व्यापार ठप्प पडल्याने त्याचा थेट फायदा पॉवरलूम उद्योग आणि त्याच्याशी संबंधित इतर उद्योगांना होत आहे. यंत्रमाग आणि कापड उद्योग यावर आलेल्या भयंकर मंदी आणि 24 तास धडधड करणारी भिवंडीच्या यंत्रमाग आणि कापड उद्योगांना कोरोना व्हायरसमुळे जणू संजीवनीच मिळाली आहे. सध्या कपड्यांची मागणी वाढत असल्याने भिवंडीतील यंत्रमाग आणि कापड उद्योगांना चांगले दिवस येतील, अशी शक्यता आहे.
भिवंडीमध्ये दररोज दोन ते अडीच दशलक्ष मीटर कापड तयार होते. भिवंडीमध्ये सूती, कृत्रिम, पॉलिस्टर, रेमंड कॉटन, पीसी आणि गणवेशात वापरल्या जाणार्या फॅब्रिकचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. भारताच्या महागड्या रंगामुळे कच्च्या कपड्यावर प्रक्रिया करण्यासाठी बहुतेक रंग चीनमधून आयात केला जात असे. पण चीनच्या रंगाऐवजी भारतीय रंगाची मागणी आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे, भिवंडी पॉवरलूम उद्योग आणि राज्यातील इतर पॉवरलूम सेंटर उदयास येण्याची संधी मिळू शकेल. पण वस्त्रोद्योगाला नक्कीच फायदा होईल याच्यात शंका नाही.
संबंधित बातम्या :
- नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह
- #CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
- Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश
- उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश