एक्स्प्लोर
मुलाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांची शीव रुग्णालयाबाहेर तोडफोड
सचिनला लेप्टोची लागण झाल्याचे निदान शीव रुग्णालयातील चाचण्यांवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबई: रुग्णाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या कारणातून रुग्णाच्या नातेवाईकांनी रविवारी शीव रुग्णालयाबाहेरच्या गाड्यांची तोडफोड केली. तोडफोडीत पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकूण 10 जवान जखमी झाले. यात पोलिसांच्या चार वाहनांसह काही खासगी वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात सुमारे शंभरहून अधिक जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
चोरीच्या आरोपाखाली धारावीत राहणाऱ्या सचिन जैस्वाल या 17 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर या तरुणाला पोलिसांनी सोडलं. मात्र त्यानंतर सचिनची तब्येत बिघडल्याने त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सचिनचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या मारहाणीमुळेच सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप सचिनच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी चौकशीची मागणी करत शीव रुग्णालयाबाहेरच्या गाड्यांची तोडफोड केली.
सचिनला लेप्टोची लागण झाल्याचे निदान शीव रुग्णालयातील चाचण्यांवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसचं शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement