एक्स्प्लोर

काँग्रेसमध्ये आता चुकीला माफी नाही!

काँग्रेसनं सचिन पायलट यांच्यावर कारवाई करुन, चुकीला माफी नाही हे दाखवून दिलंय. पण हे झालं राजस्थानच. महाराष्ट्रातही काही काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड पडू शकते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुंबई : राजस्थानमध्ये घडलेल्या घडामोडींचे थेट पडसाद आता महाराष्ट्रावर पडतायत. सचिन पायलट यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातले काही नेते काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. सचिन पायलटच्या यांच्या बाजूनं बोलल्यानं प्रवक्ते संजय झा यांना काँग्रेसनं तातडीनं पदावरुन काढून टाकलं. पक्षविरोधी भूमिका घेणे, महाविकास आधाडीतल्या घटक पक्षांवर टीका करणे, पक्षांतर्गत घडामोडी चव्हाट्यावर आणणे. असे प्रकार आता काँग्रेसमध्ये चालणार नाहीत. हे संजय झा यांच्या रूपानं इतरांना दिलेला इशाराच आहे, त्यामुळे अशा काँग्रेसच्या वाचाळवीरांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या संजय निरुमप यांच्याबद्लची नाराजी आधीच वरिष्ठाकडे व्यक्त केली आहेत. त्यात मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि नसीम खान यांचीही नावं आहेतच. काँग्रेसच्या या नेत्यांपैकी काही जणांवर भविष्यात कारवाई झालेली दिसू शकते.

'भाजपमध्ये जाणार नाही, काही लोकांनी अफवा पसरवली' : सचिन पायलट

संजय निरुमप यांनी काय ट्वीट केलंय. मुंबई काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण, राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना नेत्यांच्या जमीन घोटाळ्याची मला चौकशी करायची होती. शिवसनेविरोधात बोलणे पक्षविरोधी कृती आहे का? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का?

संजय निरुपम यांच्यावर कारवाईसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी वरिष्ठांकडे रिपोर्ट पाठवला आहे. महाविकास आघाडीत काही काँग्रेसचे नेते वितुष्ट निर्माण करायचा प्रयत्न करतायत. त्यांच्यावर कारवाईची मागणी होतेय. त्याची कारणंही तशीच आहे, तिन भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र आल्यानंतर सरकार चालवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यात काँग्रेस नेत्यांचीच काँग्रेस किंवा सराकरवर टीका म्हणजे पक्षविरोधी मोहिम चालवल्यासारखंच आहे.

आपण पाहुयात काँग्रेस नेत्यांनी काय काय टीका केली होती

  • संजय निरूपम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री 2 मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय.
  • मिलिंद देवरा : चीनप्रकरणात ट्वीटरवरून काँग्रेसला घरचा आहेर दिला.
  • प्रिया दत्त : सचिन पायलट यांच्यावर कारवाईनंतर ट्वीटरवरून नाराजी वक्त केली.
आता यापुढे पक्षविरोधी किंवा सरकारविरोधी वक्तव्य जे कोण करतील त्यांचे एआयसीसीकडे व्हिडिओ क्लिपिंग्ज आणि वृत्तपत्रांची कात्रणं सादर केल्या जाणार आहेत. म्हणजे दुध का दुध और पाणी का पाणी सिद्ध करण्यात वरिष्ठांना मदत होईल. महाविकास आघाडीचं सरकार किती दिवस चालेल यांवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. त्यात काँग्रेसच्या नेत्यांच्या टीका हे सराकराला सुरुंग लावण्यासारखं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांवर कारवाईची शक्यता आहे. Rajasthan Crisis | राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट यांचं अपिल, मुकुल रोहतगी, हरिश साळवे बाजू मांडणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Ind vs Aus 5th Test : सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 04 January 2024Beed : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; परभणीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मूकमोर्चाNCP Meeting : पालकमंत्रीपदाचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकMajha gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 04 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Ind vs Aus 5th Test : सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा; जरांगे, धस, सोनवणेंसह 'हे' बडे नेते सहभागी होणार
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
परभणीत शेकोट्या पेटल्या, कडाक्याच्या थंडीनं अंगावर शहारा, किमान तापमानाचा पारा आज किती होता?
Rohit Sharma : सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
सिडनी कसोटीत कॅप्टन असूनही स्वत:च संघाबाहेर, रोहित शर्मानं अखेर मौन सोडलं, फक्त पाच शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Embed widget