एक्स्प्लोर

राहुल गांधी शिवतीर्थावर जाणार, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार 

आज राहुल गांधी यांची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला (Balasaheb Thackeray memorial) अभिवादन करणार आहेत.   

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. या यात्रेचा आज शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. दरम्यान, या सभेपूर्वी राहुल गांधी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला (Balasaheb Thackeray memorial) अभिवादन करणार आहेत.   

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? बावनकुळेंची टीका

दरम्यान, राहुल गांधींच्या आजच्या सभेवर भाजपनं जोरदार टीका केलीय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावरुन त्यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडिओ बावनकुळेंनी ट्विट केलाय. तसेच उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? असेही बावनकुळे म्हणालेत. 

नेमकं काय म्हणालेत बावनकुळे?

शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का?  असा सवाल ट्वीटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे, असंही बावनकुळे म्हणाले.  

आज न्याय यात्रेची नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. 

इंडिया आघाडीची एकजूट पाहायला मिळणार

दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत (Mumbai) समारोप होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान 'न्याय संकल्प' पदयात्रा देखील काढण्यात येणार आहे. राहुल गांधींच्या आजच्या सभेत इंडिया आघाडीची एकजूट दिसणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. 
इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

शिवाजी पार्कवर आज राहुल गांधींची जाहीर सभा, निवडणुकीचं रणशिंग फुंकणार; इंडिया आघाडीचे दिग्गज नेते राहणार उपस्थित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget