दरेकरांना ताब्यात घेण्याविषयी फडणवीस सुचवतायेत का? मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परीषद घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्त्युत्तर दिलं.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याविषयी आमच्या सरकारमधलं कुणीही काही बोललेलं नाही. मात्र, फडणवीस आम्हाला हे सुचवू पाहात आहेत का? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षात कोण हवं आहे आणि कोण नकोय हे सुद्धा कळत नाही. प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी पत्रकार परीषद घेत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांनी पत्रकार परीषद घेत फडणवीस यांच्या जोरदार प्रत्त्युत्तर दिलं.
महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : मुख्यमंत्री
विरोधकांचं मागचं वर्ष सरकार कधी पडेल? याचे मुहूर्त शोधण्यात गेले. त्यामुळे सरकारने काय कामं केली त्याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं. दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत नाही, असाही टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. राज्यातील सलोखा बिघडवण्याचं काम विरोधकांनी करू नये. आरक्षणाबाबत मराठा नेत्यांशी चर्चा सुरु असून कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
OBC Reservation | ... तर भाजप रस्त्यावर उतरेल : देवेंद्र फडणवीस