एक्स्प्लोर
Mumbai Rain | मुख्यमंत्री आपत्कालीन कक्षात, पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन पाहणी केली.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन पाहणी केली. नालेसफाई न झाल्याने पाणी तुंबलं असं प्राथमिकदृष्ट्या म्हणता येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नालेसफाई झाली नाही, असं म्हणता येणार नाही
ताशी 50 मिमी पावसाच्या तीव्रतेनुसार सध्याच्या नाल्यांची क्षमता आहे. परंतु दोन आणि तीन तासांमध्ये 400 मिमी पाऊस पडत असेल तर या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची क्षमता तेवढी नाही. नाल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस जेव्हा येतो, तेव्हा ते दुथडी भरुन वाहतात किंवा त्यावरुन वाहतात. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे नालेसफाई झाली नाही, असं प्राथमिकदृष्ट्या म्हणता येणार नाही, पण आपल्याला बघावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महापौरांच्या विधानावर कमेंट आता योग्य नाही
मुंबई कुठे तुंबली आहे? असा प्रश्न मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विचारला होता. त्याविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "महापौरांच्या विधानावर आता कमेंट करणं योग्य ठरणार नाही. मुंबईकरांना काय दिलासा देता येईल यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. पाणी तुंबलंय की नाही, हे राजकारण तर होतच राहिल. त्यांच्या तक्रारी येत आहेत, त्या दूर कशा करायच्या याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तेच सांगितलं आहे."
आम्ही तयार आहोत
"हवामान विभागाच्या भाकितानंतर आम्ही शाळा-महाविद्यालयांना काल रात्रीच तर कार्यलयांना आज सकाळी सुट्टी जाहीर केली आहे. दुपारी 12 वाजता भरतीची शक्यता आहे. आमची परिस्थितीवर देखरेख आहे. काल रात्री मुंबई पोलिसांना 1600 ते 1700 लोकांचे ट्वीट आले आणि त्यांना तातडीने मदत मिळाली. मुंबई महापालिकेचं आपत्कालीन व्यवस्थापन रात्रभर काम करत आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. वाहतूक परिस्थिती नियंत्रणात आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सांगली
भारत
राजकारण
Advertisement