एक्स्प्लोर
Advertisement
अख्ख्या मुंबईतील बेकायदा पशू-पक्षांची विक्री बंद करा - हायकोर्ट
मुंबई: संपूर्ण मुंबईत बेकायदेशीर पशू- पक्षांची विक्री बंद करा, असा आदेश हायकोर्टाने दिला.
क्रॉफर्ड मार्केटमधील बेकायदेशीर पशू- पक्षांचा बाजार बंद दुकानांच्या आड सुरुच असल्याचे पुरावे हायकोर्टासमोर आले आहेत. त्याचबरोबर हा बाजार आता कुर्ला आणि बोरिवली परिसरातही वाढल्याचं हायकोर्टाच्या निदर्शनास आलं.
त्यामुळे आता केवळ क्रॉफर्ड मार्केट नव्हे तर संपूर्ण मुंबईत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या पाळीव पशू- पक्षांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकानं तात्काळ बंद करण्याचे आदेश हायकोर्टानं याआधी दिले होते. मात्र तरीही बंद दुकानांच्यासमोर उभं राहून धंदा सुरू असल्याचा अहवाल हायकोर्टानं यासंदर्भात बनवलेल्या समितीनं कोर्टासमोर मांडला.
हे आदेश देताना हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं की, ही दुकानं पुन्हा सुरु होणार नाहीत याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस स्टेशननं काळजी घ्यावी. मात्र तरीही बेकायदेशीपणे पाळीव पशू- पक्षांची विक्री सुरू असल्याची माहीती फोटोसह कोर्टासमोर आली.
यावर उद्यापर्यंत मुंबई महानगरपालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
पशू- पक्षांसाठी कार्यरत एका सेवाभावी संस्थेनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना पशू- पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत हायकोर्टानं हे आदेश दिलेत.
याचिकाकर्त्यांच्या मते इथं ठेवण्यात आलेल्या पशू- पक्षांवर अनन्वित अत्याचार केले जातात. त्यांना अतिशय बंदीस्त जागेत छोट्या छोट्या पिंजऱ्यात बंद करून ठेवलं जातं.
कुत्र्यांची आणि मांजरांची पिल्लं डोळे उघडायच्या आतच त्यांच्या आईपासून हिरावून इथं विक्रीसाठी आणून ठेवली जातात. अनेकदा या प्राण्यांना गुंगीची औषधं देऊन झोपवलं जातं. यासर्व बाबी लक्षात घेऊन हायकोर्टानं पाळीव पशू-पक्षांचा हा बेकायदेशीरबाजार कायमचा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement