एक्स्प्लोर

CIDCO: सिडकोकडून महत्वाची घोषणा; जवळपास आठ हजार घरांसाठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत करा अर्ज

CIDCO Housing Lottery : सिडको महामंडळाच्या (CIDCO News)  महागृहनिर्माण योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

CIDCO Housing : सिडको महामंडळाच्या (CIDCO News)  महागृहनिर्माण योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. घरांची ॲानलाईन नोंदणी केली जात असून 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. नवी मुंबईच्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर भागात  7 हजार 849 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सिडकोनं (CIDCO) नवी मुंबई (Navi Mumbai News) परिसरात 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर केली होती. 

उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त

या योजनेतील गृहसंकुलांना नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी व खारकोपर रेल्वे स्थानकांसह महामार्ग, प्रस्तावित एमटीएचएल महामार्ग यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. तसेच सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर असल्याने उलवे नोडला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.  

सिडकोच्या लॉटरीत कोणती घरं? 

नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी येथे सिडकोनं जाहीर केलेली घरं आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड नजीक हा प्रकल्प आहे. जर तुम्हीही घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल, तर सिडकोच्या घरांच्या लॉटरीसाठी आजपासून नोंदणी करता येईल. त्यासोबतच सिडकोनं ऑगस्ट 2022 मध्ये काढलेल्या 4 हजार 158 घरांच्या नोंदणीसाठी 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ घरं

सिडकोनं जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये 7849 घरं ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व 2, ए 2 बी आणि पी3, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहे. नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्येही सिडकोच्या लॉटरीतील घरं आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4158 घरांपैकी 404 घरं ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 3 हजार 754 घरं सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती. 

सिडकोकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहेत.

ही बातमी देखील वाचा

CIDCO Housing Lottery : सिडकोचं दिवाळी 'गिफ्ट'; 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर, आजपासून ऑनलाईन नोंदणी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget