एक्स्प्लोर
CCTV : ठाण्यातील रुग्णालयातून पाच तासांचं बाळ चोरीला!
विशेष म्हणजे एक महिला चोरी करुन मुख्य प्रवेशद्वारातूनच जाताना दिसत आहे. त्यामुळे या सिव्हिल रुग्णालयाची सुरक्षा कशी बेभरावश्याची आहे, हेच सिद्ध होत आहे.
ठाणे : जन्मानंतर अवघ्या पाच तासांतच नवजात अर्भकाचे ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील प्रसूती कक्षातून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार रविवारी पहाटे समोर आला. या प्रकाराने खळबळ उडाली असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला या अर्भकाला घेऊन जात असल्याचे दिसत आहे.
भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर या महिलेचे 6 तासांचे बाळ चोरीला गेले. विशेष म्हणजे आरोपी महिला चोरी करुन मुख्य प्रवेशद्वारातूनच जाताना दिसत आहे. त्यामुळे या सिव्हिल रुग्णालयाची सुरक्षा कशी बेभरावश्याची आहे, हेच सिद्ध होत आहे.
पोलिसांची पाच ते सहा पथके अर्भकाचा शोध घेत आहेत. मात्र, या प्रकारानंतर सिव्हिलमधील रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनबाहेर ठिय्या आंदोलन केले.
या आधी याच जिल्हा रुग्णालयात अनेक चोरी आणि हाणामारीचे प्रकार उघडकीस आले आहेत. तरीही सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या नावाने बोंबाबोंब आहे. ठाणे नगर पोलिसांनी याबाबत अपहरणचा गुन्हा दाखल केला आहे.
बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement