मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला? 12 आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीबाबत चर्चा होण्याची शक्यता
मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची शक्यता आहे. या भेटीत 12 आमदारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत राज्यपालांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याची शक्यता आहे. या भेटीवेळी 12 आमदारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता नवाब मलिक म्हणाले की, ज्यावेळी लोकांयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या होत्या त्यावेळी शपथ विधी राजभवनात पार पडला होता.
त्यावेळी राज्यपालांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 आमदारांच्या प्रलंबित प्रश्नबाबत विचारणा केली असता राज्यपाल भगतसिह कोश्यारी म्हणाले की, या प्रश्नाबाबत नंतर वेळ घेऊन भेटायला या. कदाचित आज जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली तर 12 विधानपरिषदेच्या प्रलंबित आमदारांच्या प्रश्नबाबत चर्चा होऊ शकते. अजूनपर्यंत तरी त्यांच्या भेटीबाबत माहिती मिळाली नाही. मात्र जर भेट झाली तर 12 आमदारांच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकते.
दरमान्य भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांना धमक्या देत आहेत या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही. सत्तेचा कितीही दुरुपयोग करा परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही. भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांना धमक्या दिल्या असून याचा नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. भाजपला जे करायचे आहे ते करावे. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा ही काय नवीन गोष्ट नाही असेही नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.
अनिल परब यांचा सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, अनिल परब त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. त्यांचा तो अधिकार आहे. जिल्हा पोलिस प्रमुख, अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्याचा अधिकार त्यांना आहे. आमची सीबीआय, आम्ही तक्रार करू अशा प्रकारची भाजपची सध्या भूमिका आहे, असंही मलिक म्हणाले.