एक्स्प्लोर

चेंबुर गोळीबार प्रकरणावर पडदा, मलिक-पाटील दिलजमाई

मुंबई : चेंबुरमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार झाल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा टाकण्यात आला आहे. नवाब मलिक आणि संजय दीना पाटील यांच्यात दिलजमाई झाल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मध्यस्थीने गोळीबार प्रकरण मिटवण्यात आलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर पहिल्यांदाच नवाब मलिक आणि संजय दीना पाटील समोरासमोर आले आहेत. विशेष म्हणजे पक्षासाठी एकत्र काम करण्याची तयारी दोघांनी दाखवली असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. त्यामुळे दोन्ही दिग्गज नेत्यांतील वादावर अखेर पडदा पडल्याचं समोर आलं आहे. अंगरक्षकाकडून पोलखोल चेंबुरमध्ये झालेल्या सभेत गोळीबार झालाच नसल्याचा दावा नवाब मलिक यांच्या अंगरक्षकाने केला होता. 'संजय पाटील आणि त्यांचे 10 ते 12 कार्यकर्ते स्टेजवर आले. यावेळी पाटील यांनी मलिक यांची भेट घेण्याचा इरादा व्यक्त केला. त्यावेळी मी त्यांना रिव्हॉल्व्हर घेऊन तुम्ही मलिक साहेबांना भेटू शकत नाही, असं सांगत मलिक यांना डाव्या बाजुला नेलं'  असं अंगरक्षकाने जबाबात सांगितलं. 'घटना घडली त्यावेळी संजय पाटील किंवा त्यांच्या सरकारी अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार झाला नाही. किंबहुना सभागृहात कोणताही फायरिंगचा आवाज मी ऐकला नाही' असा दावाही नवाब मलिक यांच्या अंगरक्षकाने केला आहे. काय आहे प्रकरण ? मुंबईतल्या चेंबूरमध्ये 29 नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या. हातात बंदूक घेऊन संजय दिना पाटील व्यासपीठावर गोंधळ घालताना दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत होतं. संजय दिना पाटलांच्या आजुबाजूला वावरणाऱ्या आणखी एका दोघांच्या हातात बंदुका असल्याची दृश्य कॅमेऱ्यानं टिपली. याच कार्यक्रमात संजय दिना पाटील यांनी गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केला होता. मुंबईतल्या चेंबूरमध्ये 141 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु होता. त्यावेळी संजय दिना पाटील 7 ते 8 बंदुकधाऱ्यांसह आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केल्याचा आरोप नवाब मलिकांनी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना केला. चेंबूरमधील मेळाव्यात धुडगूस घातल्याप्रकरणी नवाब मलिक आणि संजय दिना पाटलांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. तसंच राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्यांना अटक झाली असून 4 जण ताब्यात आहेत. नेत्यांमधल्या कुरघोडीचं आणि वैयक्तित हेव्यादाव्यांचं अतिशय किळसवाणं रुप चव्हाट्यावर आल्याने या घटनेचा अहवाल मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना दिला. या प्रकरणी संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आरोप फेटाळले होते. नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांकडे तलवार आणि चॉपर सारखी हत्यारं होती, असा पलटवार संजय दिना पाटलांनी केला होता.

संबंधित बातम्या :

चेंबुरच्या सभेत गोळीबारच नाही, मलिक यांच्या अंगरक्षकाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget