एक्स्प्लोर

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले 155 कोटी

विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल 155 कोटी दंड म्हणून वसूल केले आहेत.

मुंबई : प्रवाशांकडून दंड म्हणून आकारण्यात आलेल्या रकमेचा नवीन विक्रम झाला आहे. एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत प्रवाशांकडून दंड म्हणून आकारण्यात आलेली रक्कम तब्बल 155 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यात अंदाजे 30 लाख प्रवासी तिकीट न काढता प्रवास करत असल्याने त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. परिणामी मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 155 कोटी रुपये कमावले आहेत. यात मुंबई उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. मध्य रेल्वेचे एकूण 5 विभाग आहेत. अश्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागात मिळून ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच काळात करण्यात आलेल्या कारवाईच्यापेक्षा 10% अधिक रक्कम यावेळी केलेल्या कारवाईत जमा झाली आहे. फक्त डिसेंबर 2019 या एका महिन्यात 12 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत प्रवाश्यांना आवाहन करुन तिकीट काढून प्रवास करण्यास सांगितले आहे. मात्र, रेल्वेने यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करुन तिकीट नसलेल्या प्रवाश्यांना दंड आकारायला हवा, तरच रेल्वेमधील अश्या प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. सोबत जे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात त्यांना जास्त सोयी सुविधांचा लाभ घेता येईल. फुकट्या प्रवाशांमध्ये वाढ - मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात मात्र, यापैकी अनेकजण तिकिट न काढताच प्रवास करत असतात. पश्‍चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेवर अशा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात सर्वाधिक फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर आहेत. रेल्वेतून प्रवास करताना योग्य तिकीट न घेता तसेच फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे. बऱ्याचदा प्रवासी गर्दीमुळे किंवा घाईत असल्या कारणाने विनातिकीट प्रवासाचे धाडस करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वेच्या डेटानुसार, देशभरात दररोज 75 हजार प्रवाशी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करतात. संबंधित बातमी - डोंबिवलीच्या लोकल गर्दीचा आणखी एक बळी, लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू Mumbai | पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे | ABP Majha

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Embed widget