एक्स्प्लोर

उद्योगधंदे, शेती व्यवसाय वाचवण्यासाठी केंद्राच्या मदतीची आवश्यकता : रोहित पवार

लॉकडाऊनमुळे अनेक लघुउद्योग, मोठमोठ्या कंपन्या, शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. यांना उभारी देण्यासाठी राज्यांना केंद्राने मदत करणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडले.

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे, शेती व्यवसाय संकटात आहे. पर्यायाने या क्षेत्रात काम करणारे असंख्य कामगार आज बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे उद्योगधंदे वाचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रित उपोययोजना करणे, आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडले. कोरोनाशी लढताना या एबीपी माझाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लघु उद्योग, मोठमोठ्या कंपन्या आणि शेती व्यावसाय वाचवण्यासाठी आगामी काळात सरकारने यांना आधार देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. कोरोनाशी लढताना आतापर्यंत लोकांनी खूप चांगले सहकार्य केलंय. यापुढेही अशाच सहकार्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

20 एप्रिलपासून काही उद्योगांना शिथिलता देण्यात आली होती. मात्र, मुंबई, पुण्यात गर्दी वाढल्याने हा नियम मागे घेण्यात आला. लोकांनी आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोकांना एकाच जागी थांबवून ठेवणे हे प्रशासनाचं यश आहे. मात्र, काही ठिकाणी लोकांनी नियम मोडले. यापाठीमागे कुठेतरी जनजागृती कमी पडल्याचं दिसतंय. नागरिकांनीही काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. कारण, या सर्व गोष्टी त्यांच्या सुरक्षेसाठीच सुरु आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे अहवाल पाहिले तर ही फक्त सुरुवात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थितीत हाताबाहेर जाऊ नये, यासाठी नागरिकांच्या सहकार्य आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Coronavirus | नवी मुंबईत एकाच आयटी कंपनीतील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

उद्योगधंद्यांना वाचवण्यासाठी थोडी शिथिलता द्यावी लागेल उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही नियम आणि अटी आवश्यक आहेत. तशा प्रकारची नियमावली आली आहे. मात्र, हे नियम कठोर आहेत. पण, त्याची सध्याच्या काळात फार गरज आहे. केरळ राज्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथं लॉकडाऊन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, केंद्र सरकारने तिथं थोडी शिथिलता आणवी लागेल, असं सांगितलं. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहे. या लघुउद्योगावर जवळपास 11 कोटी लोक काम करत आहेत. त्यामुळे या सर्वांना दिलासा देण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंद्यांचे जे नुकसान झालं आहे. त्यांना काही सवलती देण्यासाठी येत्या काळात निर्णय घ्यावे लागतील. चीनी मालाविरोधात आपल्याला ठोस निर्णय घ्यावे लागतील. ज्या वस्तू आपण चीनकडून विकत घेतो, अशा गोष्टी देशात तयार कशा होतील, यासाठी अशा उद्योगधंद्यांना प्रेरणा द्यावी लागेल. यातून आपल्याला आयात-निर्यातीचे संतुलन साधता येईल.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश

शेती उद्योग वाचवणं आवश्यक कोरोना व्हायरसने देशात शिरकाव केला, त्यावेळी शेतकऱ्यांच्या फळबागा बहरल्या होत्या. त्यामुळे ऐन सुगीच्या काळात निर्यातबंदी झाल्याने आपला शेतकरी अडचणीत आला. त्याचप्रमाणे मोठ्या शहरात जाणारा शेतीमाल जाण्याचे प्रमाणही कमी झाल्याने शेतकऱ्याला दुहेरी फटका बसला आहे. शेतीमाल वाहतूक करणारे चालक पूर्वी ढाबे, हॉटेलवरती जेवायला थांबायचे. लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. त्याचाही परिणाम होत आहे. चिकनमुळे कोरोना होतो, अशा अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यावसायला त्याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. परिणामी त्या क्षेत्रात जे काम करत होते त्यांनाही याचा फटका बसला. या सर्व उद्योगधंद्यांना वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एकत्रित पावले उचलण्याची गरज आहे.

Rohit Pawar on Coronavirus | कोरोना व्हायरसशी लढताना आमदार रोहित पवार यांचं मत काय? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget