एक्स्प्लोर

Sameer Wankhede Booked : सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्या घराची तब्बल 13 तास झाडाझडती, गुन्हाही दाखल

Sameer Wankhede Booked : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले. सोबतच सीबीआयने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Wankhede Booked : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने (CBI Raid) छापे टाकले. सोबतच सीबीआयने आर्यन खान (Aryan Khan) क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.

समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटचे तत्कालीन गुप्तचर अधिकारी आशिष रंजन, के.पी. गोसावी (खाजगी व्यक्ती), सॅनविले डिसोझा (खाजगी व्यक्ती) आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "संबंधित अधिकार्‍यांनी, व्यक्ती/इतरांकडून अवाजवी फायदा मिळवण्यासाठी, इतरांसोबत गुन्हेगारी कट रचला आणि कथित आरोपींकडून लाचेच्या स्वरुपात अवाजवी फायदा मिळवला," असा आरोप सीबीआयने केला आहे.

13 तास सीबीआयकडून झाडाझडती

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या गोरेगाव इथल्या इम्पिरियल हाईट्स इमारतीत असलेल्या घरी सीबीआय छापा टाकला. तब्बल 13 तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. काल (12 मे) दुपारी साडे चार वाजता वानखेडे यांच्या घरी दाखल झालेले सीबीआयचे अधिकारी आज (13 मे) पहाटे साडेपाच वाजता बाहेर पडले. त्यांनी समीर वानखेडे यांच्या घरातील प्रिंटरसह काही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

आर्यन खानला अटक, सुटका आणि समीर वानखेडेंवरील आरोप

समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात ऑक्टोबर 2021 मध्ये एनसीबीने मुंबईतील एका क्रूझवर धाड टाकली होती. या धाडीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं. या कारवाईनंतर समीर वानखेडे देखील चर्चेत आले होते. त्यानंतर न्यायालयीन सुनावणी दरम्यान आर्यन खानची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. यासोबतच न्यायालयाने समीर वानखेडेंच्या टीमवर जोरदार ताशेरे देखील ओढले होते.

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असा आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. त्याच प्रकरणात आता सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरावर छापा टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

समीर वानखेडे यांची चेन्नईत बदली

समीर वानखेडे हे एनसीबी मुंबईचे माजी प्रमुख होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रकरणे वानखेडे यांच्या कार्यकाळात समोर आली होती. यावेळी वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. जानेवारी 2022 मध्ये, मुंबईचे NCB प्रमुख समीर वानखेडे यांची बदली महसूल गुप्तचर संचालनालयात (DRI) करण्यात आली. यानंतर, मे 2022 मध्ये समीर वानखेडे यांची बदली डीआरआयमधून चेन्नई डीजी करदाता सेवा संचालनालयात झाली.

VIDEO : Sameer Wankhede CBI Raid : आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचं धाडसत्र : ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget