लॉकडाऊनचे नियम मोडून पार्टी; वांद्रे जिमखाना अध्यक्षासह 15 सभासदांवर गुन्हा दाखल
लॉकडाऊनचे नियम मोडून पार्टी करणाऱ्या वांद्रे जिमखाना अध्यक्षा आणि 15 सभासदांवर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनचे नियम पाळावे यासाठी सरकारकडून देखील वारंवार सूचना सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही काही लोक याचं पालन करताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार वांद्रे येथील वांद्रे जिमखाना येथे उघडकीस आला आहे. वांद्रे जिमखानाच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त या जिमखान्याच्या सभासदांनी एकत्र येत वर्धापन दिन दलक्यात साजरा केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले होते. सुरक्षेच्या कुठलीच काळजी घेतली नव्हती. त्यामुळे नियमांचा भंग केल्याप्रकरणी वांद्रे जिमखाना अध्यक्षा आणि 15 सभासदांवर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात कोरोना संकटामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्यास वारंवार सांगितले जात आहे. मात्र, तरी काही लोकांवर याचा परिणाम होताना दिसत नाही. वांद्रे जिमखान्याचा 85 वा वर्धापन दिन होता. मात्र, राज्यात संचारबंदी आणि सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असताना हा सभासदांनी हा कार्यक्रम साजरा केला. इंग्लिश गाण्यावर नृत्य करत त्यांनी एका प्रकारे पार्टीच केली. यावेळी कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्स किंवा मास्क घातलेले दिसले नाही. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली.
coronvirus | राज्यात आज 1089 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा संख्या 19,063
हा व्हिडिओ नंतर युट्युबवर पोस्ट करण्यात आला. जो अॅडव्होकेट आदिल खत्री यांनी पाहिला. अॅडव्होकेट आदील खत्री यांनी व्हिडीओ तात्काळ डाऊनलोड करत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणात पुढील तपास चालू केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, सुशिक्षित आणि उच्चवर्गीय व्यक्तींकडून लॉकडाऊनचा नियम अशा मोडल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या घटनेने व्यथित झालो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात आज तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट