एक्स्प्लोर
मुंबईत JVLR वर कारची जोरदार धडक, तरुणी कोमात
30 डिसेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सायलीवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई : भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेली पादचारी तरुणी कोमात गेली आहे. मुंबईतील जेव्हीएलआरवर दुर्गानगरजवळ हा भीषण अपघात घडला. अपघाताची दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.
सायली राणे नावाची 24 वर्षीय तरुणी मैत्रिणीकडून घरी परत येत होती. त्यावेळी ती जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर चालत असताना इटिऑस कारने तिला जोरदार धडक दिली. जेव्हीएलआरवर दुर्गा नगरजवळ ही घटना घडली.
इटिऑस कारने धडक दिल्यानंतर सायली काही फूट उडाल्याचं, या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. धडक दिल्यानंतर कारसुद्धा समोरच्या झाडावर जाऊन जोरदार आदळली. कारच्या धडकेत जखमी झालेली सायली कोमात आहे.
30 डिसेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सायलीवर होली स्पिरीट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सायली 15 दिवसांपूर्वीच कोटक महिंद्रा या कंपनीमध्ये नोकरीला लागली होती. तिचे वडील रिक्षा चालवण्याचे काम करतात. ही घटना घडली त्यावेळी तिचे वडील गावी होते. सायलीच्या घरी तिचे आई-वडील, मोठा भाऊ आणि आजी आहेत.
या अपघातात 65 वर्षीय कारचालकही विश्वजीत हाटेही जखमी झाले आहेत. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार कारचा टायर फुटून कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा. एमआयडीसी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement