एक्स्प्लोर
मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली
मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली. पुलावरुन खाली कोसळण्यापूर्वी कारनं एका टेम्पोला धडक दिली आणि बॅनर लावणाऱ्या एका व्यक्तीलाही चिरडलं आहे. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली. पुलावरुन खाली कोसळण्यापूर्वी कारनं एका टेम्पोला धडक दिली आणि बॅनर लावणाऱ्या एका व्यक्तीलाही चिरडलं आहे. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. वांद्याच्या कलानगर जवळील पुलावर एका भरधाव कारनं टेम्पोला धडक दिली. यानंतर बॅनर लावणाऱ्या व्यक्तीलाही चिरडलं. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यानंतर कार पुलावरुन खाली कोसळली. त्यामुळे चालक महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगात कार चालवणारी महिला आणि तिची मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर बॅनर लावणाऱ्या व्यक्तीला नाहक आपला जीव गमावावा लागला आहे. गाडीवरुन चालक महिलेचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















