एक्स्प्लोर

दोनपेक्षा जास्त अपत्य, मुंबईतील सोसायटीच्या कमिटीवरुन दोघं निलंबित

मुंबई : मुंबई सेंट्रलमधील एका सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी अर्थात प्रबंध समितीवरुन दोन पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं आहे. दोनपेक्षा जास्त मुलं असूनही पदावर असल्याने या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदींनुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या सदनिकाधारकांना सोसायटीच्या निवडणुका लढवण्याची संमती नाही. बऱ्याचशा सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना या नियमाची माहिती नाही, किंवा माहिती असूनही ते सर्रास पायदळी तुडवले जातात. सहकारी सहाय्यक निबंधकांनी मुंबई सेंट्रलमधील हाऊसिंग सोसायटीतल्या मॅनेजिंग कमिटीवर असणाऱ्या दोघांना पदावरुन बाद केलं. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याने दोन मुलं असण्याच्या मुद्द्यावरुन दोघांवर ठपका ठेवलाच नव्हता. न्यू ग्रीन चेंबर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील हसन अली मुकादम नावाच्या सदनिकाधारकाने दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. सोसायटीचे संयुक्त खजिनदार समीर शाह आणि कमिटी मेंबर इम्रान खान यांनी सदस्यांच्या परवानगीविना रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरु केल्याची तक्रार केली होती. तक्रारीला उत्तर देताना सहाय्यक निबंधक कुमार चव्हाण (ई वॉर्ड) यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील फारसा माहित नसलेली तरतूद समोर आणली. दोनपेक्षा जास्त असेलील व्यक्ती निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत, किंवा त्यांचं नामांकन केलं जाऊ शकत नाही किंवा त्यांची नियुक्ती केली जाऊ शकत नाही. त्यानंतर शाह आणि खान यांना गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी हजेरी न लावल्यामुळे किंवा कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना पदावरुन मुक्त करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget