मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं रुपडं पालटणार! CSMTसह 'या' रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Railway Stations redevelopment News:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) मुंबईसह नवी दिल्ली, अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
Railway Stations: देशातील तीन महत्वाच्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आता होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) मुंबईसह (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) Mumbai) नवी दिल्ली (New Delhi Railway Station), अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा (Ahmedabad Railway Station) पुनर्विकास करण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे रेल्वे स्थानकांच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. देशभरात सध्या 199 रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू आहे. यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या बृहद नियोजन आणि रचनेचे काम सुरू आहे. 32 स्थानकांचे काम वेगाने प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. यातच काल नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक या तीन मोठ्या स्थानकांसाठी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
A walk-through of the graphical representation of the to be redeveloped Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station, Mumbai.#NayeBharatKaNayaStation pic.twitter.com/geueYPauRg
— Ministry of Railways (@RailMinIndia) September 28, 2022
रेल्वे स्थानकांवर मिळणार या सुविधा
प्रत्येक स्थानकात दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांच्या जागांसह सर्व प्रकारच्या सुविधा
रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना स्थानकाची इमारत असल्याने शहराच्या दोन्ही बाजू या स्थानकांनी जोडलेल्या असतील.
फूड कोर्ट, प्रतीक्षा कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.
शहरांच्या अंतर्गत भागात असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असेल.
रेल्वे स्थानकांना आरामदायी करण्यासाठी योग्य प्रकारची प्रकाशव्यवस्था, रस्ता शोधण्याचे नकाशे/खुणा, ध्वनिव्यवस्था, लिफ्ट/सरकते जिने/ट्रॅव्हलेटर्स असतील.
वाहतूक सुलभ होण्यासाठी पुरेशा पार्किंग व्यवस्थेसह बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे.
मेट्रो, बस इत्यादींसारख्या इतर परिवहन सुविधांसोबत एकात्मिकरण करण्यात येईल.
सौर उर्जा, जल संवर्धन/पुनर्चक्रीकरण आणि सुधारित वृक्ष आच्छादनासह हरित इमारत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
दिव्यांग स्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल.
इंटेलिजन्ट बिल्डिंगच्या संकल्पनेवर ही स्थानके विकसित करण्यात येतील.
आगमन आणि प्रस्थान यांची स्वतंत्र विभागणी करणारी व्यवस्था असेल.
सीसीटीव्हीसह विविध सुरक्षा सुविधांनी परिपूर्ण अशी रेल्वे स्थानके असतील.
📍Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT), Mumbai pic.twitter.com/V9cMMa5jpU
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 28, 2022
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai साठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास होणार
ठगाचा प्रताप! चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं Facebook अकाऊंट उघडून पैशांची मागणी, गुन्हा दाखल