एक्स्प्लोर

मोठी दुर्घटना! मुंबईतील ग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली, एका महिलेचा मृत्यू, तर 3 जण जखमी

मुंबईतील ग्रँट रोड (Grant Road) इथं एका इमारतीचा काही भाग कोसळून (Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 ते 22 नागरीक अडकल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Grant Road Building Collapse News: मुंबईतील ग्रँट रोड (Grant Road) इथं एक दुर्दैवी घटना घडलीय. ग्रँट रोड इथं  एका म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळून (Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर बचावकार्य सुरु झाले होते. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.  

ग्रॅण्ड रोड स्थानकाबाहेर रुबिनिसा मंझील ही इमारत आहे. या इमारतीचा तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग सकाळी 11 वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. अग्निशमाक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत 20 ते 22 नागरिक अडकले आहेत. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत. ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत आहे. ही म्हाडाची इमारत आहे. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. 

मोठी दुर्घटना! मुंबईतील ग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली, एका महिलेचा मृत्यू, तर 3 जण जखमी

पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत

दरम्यान, आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाहतुकीवर देखील मोठी परिणाम झाला आहे. रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा उशीरानं सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळं नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. 

मुंबईत पुढील काही तास आणखी पावसाचा जोर कायम राहणार

सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळेच इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरु झाली की, अशा इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना आज ग्रॅण्ड रोड परीसरात घडली. रुबिनिसा मंझील नावाच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात येत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत पुढील काही तास आणखी पावसाचा जोर कायम राहणार आहे.  

महत्वाच्या बातम्या:

मुसळधार पावसाने चिपळूणमधील कॉलेजची संरक्षक भिंत कोसळली, दुर्घटनेत विद्यार्थ्यांचा मृत्यू

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget