Mumbai Metro : गणेशोत्सवात मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर, मुंबई मेट्रो लाईन 2A आणि Line 7 वर गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार; जाणून घ्या टाईमटेबल
Mumbai Metro Ganeshotsav Timetable : गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मेट्रो हा सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय ठरणार आहे.

मुंबई : मुंबईत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) काळात भाविकांना प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा यासाठी MMRDA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने मोठा निर्णय घेतला आहे. आता Metro Line 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि Metro Line 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील गाड्या रात्री 11:00 ऐवजी 12:00 वाजेपर्यंत धावणार आहेत. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 11 दिवसांसाठी उपलब्ध असेल.
प्रवाशांसाठी वाढीव सुविधा (Extra Metro Services)
Weekdays (सोमवार–शुक्रवार):
- एकूण 317 फेऱ्या (आधीच्या 305 फेऱ्यांपेक्षा 12 फेऱ्यांची वाढ)
- Peak hours मध्ये दर 5 मिनिटे 50 सेकंदांनी गाडी
- Non-peak hours मध्ये दर 9 मिनिटे 30 सेकंदांनी गाडी
Saturday (शनिवार):
- एकूण 256 फेऱ्या (आधीच्या 244 फेऱ्यांपेक्षा 12 फेऱ्यांची वाढ)
- Peak hours मध्ये दर 8 मिनिटांनी गाडी
- Non-peak hours मध्ये दर 10 मिनिटे 25 सेकंदांनी गाडी
Sunday (रविवार):
- एकूण 229 फेऱ्या (आधीच्या 217 फेऱ्यांपेक्षा 12 फेऱ्यांची वाढ)
- दर 10 मिनिटांनी गाडी
आवश्यकतेनुसार अतिरिक्त फेऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी चालवल्या जातील
गणेशभक्तांसाठी विशेष सोय
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत लाखो भाविक (Devotees) विविध गणेश मंडळांना (Ganesh Mandals) भेट देतात. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण येतो. अशावेळी मेट्रो (Mumbai Metro) ही सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पर्याय ठरते. त्यामुळे या काळात भाविकांना रात्री उशिरापर्यंत सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी MMRDA ने हा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी मेट्रो (Mumbai Metro) हा सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय ठरणार आहे. MMRDA च्या या निर्णयामुळे मुंबईतील भाविकांना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. लाखो भाविक 11 दिवस मुंबईभर प्रवास करतात. त्यांना मध्यरात्रीपर्यंत सुरक्षित प्रवास मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. Metro Line 2A आणि 7 या मार्गिकांवरील सेवा वाढवल्यामुळे भाविकांना शहरभरातील गणेश मंडळांना सहज जाता येईल. तसेच मुंबईसाठी जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या आमच्या ध्येयाला ही सेवा पूरक ठरेल."
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या हृदयात विशेष स्थान असलेला उत्सव आहे. या काळात नागरिक सुरक्षित आणि तणावरहित प्रवास करू शकतील यासाठी मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना उत्सवाचा आनंद चिंता न करता घेता येईल."
ही बातमी वाचा:
























