एक्स्प्लोर
Advertisement
अनैतिक संबंधांतून वसईत मेहुण्याकडून भावजींची हत्या
21 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी हद्दीत हत्या करुन मृतदेह फेकून आरोपी फरार झाले होते. चार महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात वालीव पोलिसांना यश आलं आहे.
वसई : वसईत चार महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधांतून सख्ख्या मेहुण्यानेच भावजींची निर्घृण हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.
21 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी हद्दीत हत्या करुन मृतदेह फेकून आरोपी फरार झाले होते. चार महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात वालीव पोलिसांना यश आलं आहे.
दीपक नेपाले या तरुणाचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी परिसरात आढळला होता. डोक्यावर वार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन मृतदेहाची ओळख पटवणं आणि आरोपीचा शोध घेणं, असा तपास पोलिस करत होते.
मयत तरुण हा घरफोड्या करणारा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मयत दीपक नेपालेवर वालीव पोलिस ठाण्यात घरफोडीचे तीन गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलं होतं.
तपासात मयताच्या हातावर गोंदवलेली निशाणी महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिस ठाण्यातील रेकॉर्डच्या आधारे मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. या अनुषंगाने तपास केला असता ही हत्या मयताच्या पत्नीच्या सख्ख्या भावानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने केल्याचं निष्पन्न झालं होतं.
दीपकच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रताप त्यागी आणि अंकुश यादव या सराईत गुन्हेगारांना अटक केली. अनैतिक संबंधांतून दीपक नेपालेची हत्या केल्याची कबुली वालीव पोलिसांना दिली आहे.
मयत आणि आरोपी असे तिघेही घरफोडीतील सराईत चोरटे आहेत. त्यांच्या आणखी एका साथीदाराचा अपघातात मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या साथीदाराच्या पत्नीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधातून त्यांचे वाद झाले होते. याच वादातून ही हत्या केली असल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement