एक्स्प्लोर

High Court : प्रलंबित खटल्यांचा डोंगर तुमच्यामुळेच उभा; हायकोर्टानं केंद्र सरकारला खडसावलं

High Court Slam Central Government : तुमच्यामुळे कोर्टात प्रलंबित खटल्यांचा डोंगर उभा राहिला असल्याचे खडेबोल हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावले आहेत.

मुंबई : प्रलंबित खटल्यांची आकडेवारी तुमच्यामुळेच वाढलीय, तुम्ही वारंवार सुनावणी तहकूब करण्याची विनंती करता. तुमच्यामुळेच हा रखडलेल्या खटल्यांचा डोंगर वाढत चालला आहे आणि वर दोष न्यायालयाला देता. तेव्हा न्यायालयाला दोष देण्याआधी आत्मपरिक्षण करा, असे खडेबोल मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) केंद्र सरकारला सुनावलेत.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला सुनावले आहे. आमच्या समोर सुनावणीसाठी असलेली ही याचिका साल 2016 मध्ये दाखल झाली आहे. आणि यात तुमचं प्रतिज्ञापत्र आणि याचिकाकर्त्याचे प्रत्युत्तर आत्ता सादर झालंय. सध्या ॲडीशनल सॉलिसिटर जनरल यांना वेळ नाही म्हणून तुम्ही सुनावणी तहकूब करण्याची मागणी म्हणता?, तुमच्याकडे दुसरा वकीलच नाही का?, या शब्दांत हायकोर्टानं केंद्र सरकारबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

काय आहे याचिका :

पुणे रहिवासी रामकली गुप्ता यांनी ॲड. संजय क्षीरसागर यांच्यामार्फत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. लोहगाव येथील हवाई दलाच्या हद्दीत त्यांची एक जागा आहे. मात्र ती जागा आमच्या हवाई हद्दीत येते, असा दावा करत संरक्षण विभागानं त्यांना तिथं बांधकाम करण्यास परवानगी नाकारली. नियमानुसार संरक्षण दलाच्या हद्दीपासून शंभर मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही. मात्र आमची जागा त्यांच्या हवाई दलाच्या हद्दीपासून 1.6 कि.मी लांब आहे. त्यामुळे बांधकामास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. गुप्ता यांनी सादर केलेल्या नकाशाच्या आधारावर केंद्र सरकारनं त्यांचे प्रत्युत्तर सादर करावं, असे आदेश देत हायकोर्टानं ही सुनावणी 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत तहकूब केली आहे.

ऑगस्ट 2023 मधील सुनावणीत तुम्हाला तयारीसाठी वेळ दिला होता. तरीही तुम्ही तयारी केलेली नाही, याचिकाकर्त्याची जागा हवाई दलाच्या हद्दीत आहे.‌ त्यामुळे त्याला तुम्ही बांधकाम करायला परवानगी देत नाही.‌ आता तुम्हाला त्या जागेचं पुन्हा मोजमाप करायचं आहे. मग साल 2016 पासून काय करत होतात?, या जागेचं सर्वेक्षण करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं?, संरक्षण दल तुम्ही, केंद्र सरकार तुम्ही, आणि तुम्हीच तुमच्या जागेचं संरक्षण करु शकत‌ नाही?, मग सर्वसामान्य माणसाचं रक्षण तुम्ही काय करणार?, असा सवालही यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलंAjit Pawar Full PC : दिल्लीत जरा आराम मिळतो... अजित पवारांनी सगळंच सांगितलं ABP MAJHADevendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget