एक्स्प्लोर

अर्णब गोस्वामींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, जामीन अर्ज फेटाळला!

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे.

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा हायकोर्ट त्यात हस्तक्षेप करुन ती अटक बेकायदेशीर ठरवून त्याला जामीन देऊ शकत नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निकालाचं वाचन केलं. अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करावा. नियमानुसार त्या कोर्टातून मग हायकोर्टाचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहिल, असे निर्देश हायकोर्टाने दिले.

दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या अर्धा ते एक तासापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पुढील चार दिवसात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत. चार दिवसात सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही तर अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहातच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की त्यांची  दिवाळी तुरुंगातच साजरी होणार हे अलिबाग सत्र न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन, अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त 

अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार; अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय? ज्यात अर्णब गोस्वामींना अटक झालीय!

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget