एक्स्प्लोर

कमी संख्याबळावर मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला काम करू देण्यास हायकोर्टाचा नकार

जास्तीत जास्त 15 सदस्य संख्या असलेल्या या समितीचे अध्यक्षपद हे पालिका आयुक्तांकडे असून यात 7 नगरसेवक आणि वनस्पतीशास्त्रातील ७ जाणकार समाविष्ट करणं अनिवार्य आहे. मात्र यापूर्वीच्या समितीत केवळ 14 नगरसेवक बसवल्यानं हायकोर्टानं या समितीलाच स्थगिती दिली आहे.

मुंबई : पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत जर जाणकारांची संख्याच कमी असेल तर त्यांच्या मताला किंमत राहिलं का?, एखाद्या मुद्यावर मतभेद झाल्यास काय करणार? असा सवाल विचारत हायकोर्टानं या समितीच्या कामकाजावर लावलेली स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे.
सध्याच्या समितीत केवळ चार जाणकारांची नियुक्ती होऊ शकली आहे. जाहिराती देऊनही या सेवाभावी पदांसाठी उमेदवार मिळत नसल्याची खंत पालिकेनं कोर्टाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे रखडेलली कामं पाहता उपलब्ध सदस्यांसह या समितीला काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रशासनाच्यावतीनं बुधवारी कोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र हे शक्य नसल्याचं सांगत सुट्टिकालीन कोर्टाचे न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं ही स्थगिती कायम ठेवत हे प्रकरण 3  जूनला नियमित खंडपीठापुढे सुनावणीसाठी वर्ग केलं आहे.
जास्तीत जास्त 15 सदस्य संख्या असलेल्या या समितीचे अध्यक्षपद हे पालिका आयुक्तांकडे असून यात 7 नगरसेवक आणि वनस्पतीशास्त्रातील 7 जाणकार समाविष्ट करणं अनिवार्य आहे. मात्र यापूर्वीच्या समितीत केवळ 14 नगरसेवक बसवल्यानं हायकोर्टानं या समितीलाच स्थगिती दिली आहे.
मुंबईत वृक्षतोडीची परवानगी देण्याचे अधिकार याच समितीकडे असल्यानं मॉन्सून पूर्वतयारी म्हणून धोकादायक झाडांची छाटणी, मुंबई मेट्रो, रस्ता रूंदीकरण अशी अनेक विकास कामं खोळंबली आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांच्या समस्यात वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दादर, हिंदमाता, परळ येथील काही झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याची आवश्‍यकता आहे, असे महापालिकेच्यावतीनं हायकोर्टाला सांगण्यात आलं.
सध्या वृक्षतोडीची परवानगी मिळत नसल्यानं 23 हजार कोटींचा मुंबई मेट्रो प्रकल्प  उभारणा-या मुंबई मेट्रो रेलप्राधिकरणाला दिवसाला 4.28 कोटींचं नुकसान होतंय. अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या कामावरील स्थगिती उठवावी अशी विनंती पुन्हा एकदा कोर्टाकडे करण्यात आलीय. पर्यावरण प्रेमी झोरु भटेना यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget