एक्स्प्लोर

Mumbai BMC: मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे; पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर, लवकरच निर्णय होण्याची शक्यता

Mumbai BMC: मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. तूर्तास आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका पाणीपट्टीच्या दरवाढीत अडसर ठरण्याची चिन्हे आहेत. गेली दोन वर्षे मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. जल विभागाच्या खर्चामध्ये साधारण 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जल विभागाने पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीमध्ये 8 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा विचार जल विभागाच्या पातळीवर सुरू आहे. मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली दोन वर्षे मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती. जल विभागाच्या खर्चामध्ये साधारण 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जल विभागाने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपट्टीत 8 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची तरतूद करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिका सभागृह आणि स्थायी समितीने या तरतुदीला मंजुरी दिली. त्यामुळे प्रशासनाला थेट पाणीपट्टीमध्ये 8 टक्के दरवाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा आधार घेत पाणीपट्टीमध्ये 8 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा विचार जल विभागाच्या पातळीवर सुरू आहे.

मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत 2021 मध्ये संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढ होईल की नाही याबाबत साशंकता आहे. निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय घेतला जाणार की, नाही याबाबची चर्चा आता मुंबईकरांमध्ये सुरू आहे. दरम्यान, यासंबधीचा प्राथमिक प्रस्ताव महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर लेखा परीक्षण विभागाशी चर्चा करून यासंबधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर नव्या प्रस्तावाला आयुक्तांची प्रशासकीय मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे जल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणांमधून वाहून आणलेल्या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. जलवाहिन्यांमधून मुंबईकरांच्या घरोघरी पाणी पोहोचवले जाते. धरणांमधून मोठ्या मुख्य जलवाहिन्यांमधून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून आणणे, पाण्यावर शुद्धकरणाची प्रक्रिया करणे, घरोघरी पाणी पोहोचवणे आदी कामांसाठी महापालिकेला मोठा खर्च येतो. मुंबईमधील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती, जल बोगद्यांची निर्मिती, देखभाल, दुरुस्ती आदी कामांसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागतो. मुंबईकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून काही भाग हा खर्च भागवण्यात येतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Fadnavis Call To Nagpur Police | चांगलं काम केलं, नागपूरच्या जखमी डीसीपींना मुख्यमंत्र्यांचा फोनNitesh Rane PC | सुरुवात त्यांनी केली,सरकार धडा शिकवणार! नागपूरच्या घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रियाEknath Shinde PC : लोकभावनेच्या विरोधात जाऊन कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले..Udayanraje Bhosale PC : शिवरायांचे विचार महाराष्ट्राला एकसंघ ठेवतात,नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्य थांबवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
Embed widget