एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेला लवकरच मिळणार तब्बल 1800 कोटींची प्रॉपर्टी

हे प्रकरण तब्बल 15 वर्षे कोर्टात प्रलंबित होतं. आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून. पालिकेला तब्बल 1800 कोटी रुपयांची प्रॉपर्टी मिळणार आहे. तसेच रुग्णालयाने थकवलेला 140 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स देखील पालिकेकडून वसूल करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईतील मरोळ येथे असणाऱ्या सेव्हन हिल हॉस्पिटलला भाडे तत्त्वावर मुंबई महापालिकेने दिलेली जागा पुन्हा महापालिकेला मिळणार आहे. 2004- 05 साली महापालिकेने केलेल्या कराराचं पालन न केल्यामुळे ही जागा पुन्हा महापालिकेला मिळणार आहे. 2004 साली पालिकेने सेव्हन हिल हॉस्पिटलला तब्बल सतरा एकर जागा दिली होती. त्यावेळी पालिकेने या जागेच्या बदल्यात रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी 20 टक्के जागा राखीव ठेवाव्यात असं ठरवण्यात आलं होतं. यानंतर रुग्णालयाने याठिकाणी एक इमारत बांधली परंतु करारानुसार ते सेवा पुरवण्यात अपयशी ठरल्याचं लक्षात आल्यानंतर पालिकेने त्यांच्याविरोधात कडक कारवाईचं धोरण अवलंबले. दरम्यानच्या काळात रुग्णालय प्रशासन देखील अडचणीत आलं. हे प्रकरण तब्बल 15 वर्षे कोर्टात प्रलंबित होतं. आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून. पालिकेला तब्बल 1800 कोटी रुपयांची प्रॉपर्टी मिळणार आहे. तसेच रुग्णालयाने थकवलेला 140 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स देखील पालिकेकडून वसूल करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, सदर रुग्णालयाने करारावेळी केलेल्या अटी पूर्ण केल्या नाहीत. याठिकाणी रुग्णालयाने 1400 खाटांचे रुग्णालय पाच वर्षात उभारने अपेक्षित होतं. त्यातील 20 टक्के जागा गरीब रुग्णांना कमी पैशात द्याव्यात असं करारात नमूद करण्यात आलं होतं. परंतु रुग्णालय प्रशासनाकडून या अटी पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालिकेने रुग्णालय प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला होता. हे संपूर्ण प्रकरण मागील 8 ते 9 वर्षे सुप्रीम कोर्टात होतं. आता याठिकाणी पालिका लवकरच अद्यावत रुग्णालय किंवा आरोग्य सेवेशी निगडीत सुविधा असणारं केंद्र उभारणार आहे, असे जोशी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
Mhada Lottery Mumbai Homes: मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?
मोठी बातमी: मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठीची प्रतीक्षा संपणार, MHADA लॉटरीची तारीख अखेर जाहीर, कधी होणार घोषणा?
Uddhav Thackeray: ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल; नेमकं कारण काय?
ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल; नेमकं कारण काय?
Mumbai : मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीचा मुद्दा, दीड महिन्यांपासून आयुक्तांसोबत साधी भेट नाही; मुंबई विधी समितीच्या अध्यक्षांनी मौन सोडलं, आता थेट उदय सामंतांकडे दाद मागणार
मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीचा मुद्दा, दीड महिन्यांपासून आयुक्तांसोबत साधी भेट नाही; मुंबई विधी समितीच्या अध्यक्षांनी मौन सोडलं, आता थेट उदय सामंतांकडे दाद मागणार

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Embed widget