एक्स्प्लोर

122 Engineers Transfers : BMC मधील 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर प्रशासनाचा यू-टर्न, नेमकं प्रकरण काय?

122 Engineers Transfers : अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे हे प्रकरण पाठवण्यात आलं आणि अखेर 122 अभियंत्यांच्या बदली आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई:  मुंबई महापालिकेने 122 अभियंत्यांच्या बदल्या (122 engineers transfers) अखेर रद्द केल्या आहेत. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे संपूर्ण प्रक्रिया वादात सापडली होती.  महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केल्यानंतर प्रशासन हललं. अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे हे प्रकरण पाठवण्यात आलं आणि अखेर 122 अभियंत्यांच्या बदली आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. (122 engineers transfers)

 RTI कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता त्या बदल्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेतील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(122 engineers transfers) 

एकीकडे हा निर्णय भ्रष्टाचारा विरोधातील कारवाई म्हणून पाहिला जात असला, तरी दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्या रद्द कराव्या लागणं, ही प्रशासनातील अनियमिततेची कबुली मानली जात आहे. दरम्यान, भविष्यातील बदली प्रक्रिया स्वतंत्र आणि पारदर्शक समितीमार्फत राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे. BMC मधील कथित ‘ट्रान्सफर मार्केट’चा मुद्दा आता आणखी तापण्याची चिन्हं आहेत.(122 engineers transfers)

मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द केल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतर सहा महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आलेल्या १२२ हून अधिक नागरी अभियंत्यांच्या बदल्या पालिकेने अधिकृतपणे रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे पालिकेतील कथित 'बदल्यांच्या बाजाराला' मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.

122 Engineers Transfers : नेमकं प्रकरण काय?

ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबई महापालिकेतील १२२ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केला होता. या तक्रारींची दखल घेत तत्कालीन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या बदल्यांना तातडीने स्थगिती दिली होती. या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या पालिका आदेशात म्हटले आहे की, "ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या १२२ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश आता रद्द करण्यात येत आहेत."

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget