एक्स्प्लोर

मेट्रो कंत्राटदाराला बीएमसीचा दणका! मेट्रोची कामे तात्काळ थांबवा, वाढत्या प्रदूषणानंतर काम थांबवण्याची नोटीस

वांद्रे पूर्व आणि सांताक्रुज पूर्व या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम कामांना सुद्धा मुंबई महापालिकेने नियमांचे उल्लंघन करत असल्या प्रकरणी या साईटवर काम बंद करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्वाच्या शहरांत प्रदूषण वाढत असून मुंबईत (Mumbai) भीषण परिस्थिती उद्भवली आहे. मेट्रो 3 (Metro 3)  कंत्राटदाराला दणका देण्यात आला आहे. काही दिवस काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आलीय. प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आलीय.   मुंबईत  प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बीकेसी भागात योग्य रीतीने होत नसल्याने मुंबईतील मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला बीएमसीकडून काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या वायू प्रदूषणासंदर्भात आज आढावा घेणार आहे.  पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेतील कर्मचारी राहाणार  बैठकीला उपस्थित राहणार आहे.  वाढत्या प्रदूषणच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व आणि सांताक्रुज पूर्व या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम कामांना सुद्धा मुंबई महापालिकेने नियमांचे उल्लंघन करत असल्या प्रकरणी या साईटवर काम बंद करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.

मुंबईतील 14 प्लांटसला नोटीस

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा मुंबईतील 14 प्लांटसला नोटीस पाठवली आहे.  जे मुख्यत्वे करून मुंबईतील कोस्टल रोड, एमटीएचएल, मेट्रो कॉरिडॉर यासारखे विकास प्रकल्पांची काम करत आहेत.  मुंबई मेट्रो तीन लाईनच्या कामामध्ये आयटीओ जंक्शन येथे बांधकाम सुरू असताना एका साइट बॅरिकेड केलेली नव्हती किंवा ताडपत्री/हिरव्या कापडाने साईट झाकलेली नव्हती आणि कामगारांना मास्क दिले गेले नव्हते हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर त्यांना काम थांबवण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

उपाययोजना केल्यानंतर मुंबईतील हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा 

मुंबई महापालिका, एमपीसीबीकडून मागील 48 तासात उपाययोजना करण्यात आल्यानंतर मुंबईतील हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा   झाली आहे.  मुंबईतील अनेक भागातील हवा गुणवत्ता पातळी समाधानकारक ते माॅडरेट श्रेणीत गेली आहे.  

मुंबईसह राज्याची हवा बिघडली

राज्यातील काही शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality Level) मध्यम (Moderate) ते वाईट (Bad) श्रेणीत आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम 10 ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी समोर आली आहे. 

हे ही वाचा :

Mumbai Pollution: मुंबईतली 'सोन्याची झळाळी' बेतली मुंबईकरांच्या जीवावर, विषारी धुरामुळे अनेकांना जडल्या व्याधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget