एक्स्प्लोर

विकासकामं नंतर, आधी नामांतर? मुंबई पालिकेच्या पहिल्या सभेत 27 पैकी 20 प्रस्ताव नामकरणाचे

पायाभूत सुविधांवरील ठोस निर्णयांपेक्षा नामांतराच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

Mumbai Municipal corporation: चार वर्षांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत शहरातील खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमणे, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य मिळेल, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. मात्र, 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या बैठकीच्या अजेंड्यावर रस्ते, पूल, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरण-नामांतराचे तब्बल 27 पैकी 20 प्रस्ताव अग्रक्रमावर असल्याने ‘विकासकामं नंतर, आधी नामांतर?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

सभेत उर्वरित प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत असून, एक प्रस्ताव पदपथावरील गटई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवरील ठोस निर्णयांपेक्षा नामांतराच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

प्रमुख नामांतर प्रस्ताव

वरळी जलतरण तलावाचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’ असे करण्याचा प्रस्ताव.

घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावरील पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ हे नाव देण्याचा प्रस्ताव. 

काळा घोडा येथील चौकाचे नामांतर ‘सायमन पेरेस चौक’ असे करण्याचा प्रस्ताव.

अंधेरी (पश्चिम) येथील एका रस्त्यास ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव

मालाड (पश्चिम) येथील जलतरण तलावाचे नामांतर ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव’ असे करण्याचा प्रस्ताव.

पवई जंक्शनला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव.

याशिवाय लालबाग येथील बॉम्बे गॅस लेन मैदान, मुलुंडमधील झुलेलाल मंदिराजवळील चौक, चेंबूरमधील सांडू गार्डनजवळील रस्ता, परळ व कुर्ला येथील चौक अशा अनेक ठिकाणांच्या नामांतराचे प्रस्ताव सभागृहात मांडले जाणार आहेत.

‘टिपू सुलतान’ प्रस्तावावरून राजकारण

पूर्वी शिवसेना-भाजप सत्ताकाळात एका रस्त्यास Tipu Sultan यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला भाजपकडून पाठिंबा मिळाल्याची आठवण करून देत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, 25 फेब्रुवारीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी नसल्याचे समजते.

मूलभूत प्रश्नांवर दुय्यम प्राधान्य ?

शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यापूर्वीचे काँक्रिटीकरण, वाढती अतिक्रमणे, पाणीटंचाई यांसारखे प्रश्न ऐरणीवर असताना नामांतराच्या प्रस्तावांना अग्रक्रम देणे योग्य आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

पालिकेच्या नव्या कार्यकाळातील पहिलीच बैठक ‘विकास’ की ‘नामांतर’ या मुद्द्यावर रंगणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर ठोस निर्णय होतात की राजकीय नामांतरावरच चर्चा रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget